मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरिजचा शेवटचा सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आशिया कप खेळणार आहे. यासाठी सोमवारी भारतीय संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. 27 ऑगस्टपासून आशिया कपची सुरुवात होणार आहे. आशिया कपसाठी 15 खेळाडूंमध्ये कोणाची निवड होणार आणि कोणाचा पत्ता कट होणार ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांचं टीममधील स्थान निश्चित आहे. विराट कोहली आणि केएल राहुल आशिया कपसाठी टीममध्ये परतल्याने फलंदाजीच्या क्रमवारीत मोठा बदल होऊ शकतो. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा ऑलराउंडरची भूमिका निभावतील. 


बॉलिंगमध्ये युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार टीममध्ये असणार आहेत. दुखापतीतून सावरल्यानंतर हर्षल पटेल पूर्ण बरा झाला तर त्यालाही टीममध्ये सहभागी केलं जाण्याची शक्यता आहे. 


फलंदाजीमध्ये दीपक हुड्डा, संजू सॅमसन, ईशान किशन आणि दीपक हुड्डा यापैकी टीममध्ये कोणाला संधी दिली जाऊ शकते हे पाहाणं महत्त्वाचं ठरेल. तर बॉलिंगमध्ये अर्शदीप सिंह, आवेश खान यापैकी कोणाला कॅप्टन निवडणार हे पाहावं लागणार आहे.  तर दीपक चाहर देखील या स्पर्धेत आहे. त्यामुळे त्याला संधी मिळणार का हे देखील पाहावं लागणार आहे. 


स्पिनरमध्ये अक्षर पटेल, रवि बिश्नोई आणि कुलदीप यादव दावेदार आहेत. मात्र कुलदीप, अक्षर आणि जडेजा यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. त्यामुळे बॅकअपसाठी कोणाला घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन : 
रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, दीपक हुड्डा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, दीपक चाहर.