Virat Kohli Viral Video: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) एशिया कपच्या फायनलमध्ये (Asia Cup Final) खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. रविवारी म्हणजे 17 सप्टेंबरला भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) आमने सामने येणार असन कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता अंतिम सामन्याला सुरुवात होईल. एशिया कप स्पर्धेच्या इतिहासत भारताने आतापर्यंत सर्वाधिक सात वेळा जेतेपद पटकावलं आहे आणि आता आठव्यांदा टीम इंडिया एशिया कपवर नाव कोरणार का याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांच लक्ष लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली अपघातातून बचावला
अंतिम सामन्याआधी टीम इंडियाला सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध पराभव पत्करावा लागला. य सामन्यात पाच प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. यात स्टार फलंदाज विराट कोहलीचाही (Virat Kohli) समावेश होता. विशेष म्हणजे मैदानाबाहेर असतानाही विराट कोहली चर्चेत होता. सामन्यात विराटने वॉटरबॉयची भूमिका बजावली. मैदानात पाणी घेऊन येताना अतरंगी हावभाव करत असतानाचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता विराटचा आणखी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात विराट कोहली एका गाडीला धडकण्यापासून थोडक्यात बचावताना दिसतोय. 


काय आहे व्हायरल व्हिडिओत
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत विराट कोहली मैदानात बाऊंड्री लाईनवर उभा असलेला दिसतोय. त्याचं लक्ष डगआऊटकडे होतं. त्याचवेळी मैदान कवर करण्यासाठी वापरली जाणारी गाडी त्याच्या अगदी जवळ येते. गाडीचा ड्रायव्हर जोराने हॉर्न वाजतो. गाडी अचानक जवळ आल्याचं पाहून विराटच्या चेहऱ्यावरचे रंग बदललेले दिसतायत, तो उडी मारून बाऊंडीच्या बाहेर जातो. हा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. लोकांनी या व्हिडिओवर भरपूर कमेंट्सही दिल्या आहेत. 



विराट कोहली बनला वॉटरबॉय
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वॉटरबॉय बनलेल्या विराट कोहलीने संर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सामन्यादरम्यान विराट कोहली पाणी घेऊन मैदानात आला होता. पण मैदानात त्याने अतरंगी अंदाजात एन्ट्री केली. धावताने त्याने मधेच उड्या मारल्या. त्याचा हा अंदाज कॅमेरात कैद झाला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. 


श्रीलंकेविरुद्ध भारताची संभाव्य प्लेईंग XI
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज