Asian Games : ऋतुराजच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानाात उतरणार, अशी असेल प्लेईंग 11
Asian Games 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज असतानाच तिकडे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली गोल्ड मेडल पटकावण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ मैदानात उतरणार आहे. एशियन गेम्समध्ये पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट संघ खेळणार आहे.
Asian Games 2023 : भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून आसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला (ODI World Cup 2023) सुरुवात होईल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाचं (Team India) मिशन वर्ल्ड कप येत्या 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. एकीकडे टीम इंडिया विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज होत असतानाच दुसरीकडे ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikawad) नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ एशियन गेम्समध्ये (Asian Games 2023) गोल्ड मेडल पटकावण्यासाठी मैदानात उतरणार आहे. चीनमध्ये सुर असलेल्या एशियन गेम्समध्ये क्रिकेट प्रकारात पहिल्यांदा भारतीय क्रिकेट संघ खेळणार आहे. रँकिंगनुसार टीम इंडिया थेट क्वार्टर फायनल खेळणार आहे.
क्वार्टर फायनलमध्ये भारताची गाठ मंगळवारी म्हणजे 3 ऑक्टोबरला नेपाळशी पडणार आहे. या स्पर्धेत नेपाळे याआधीच धमाल उडवून दिली आहे. मंगोलियाविरुद्धच्या सामन्यात नेपाळने अनेक विक्रम रचले. त्यामुळे टीम इंडियाविरुद्ध नेपाळचा संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल. एशियन गेम्ससाठी बीसीसीआने इंडिया ए टीम पाठवली आहे. याचं कर्णधारपद ऋतुरा गायकवाडकडे सोपवण्यात आलं आहे. या स्पर्धेतील नेपाळचा फॉर्म बघता ऋतुराज गायकवाड आपली बेस्ट प्लेईंग इलेव्हन मैदानात उतरवेल. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारे खेळाडू टीम इंडियात आहेत. यातल्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.
या खेळाडूंना मिळणार संधी
नेपाळविरुद्धच्या सामन्यात कर्णधार ऋतुराज गायकवाड सलामीला खेळण्याचं निश्चित आहे. त्याच्याबरोबर डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करेल. जुलैमध्ये झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात यशस्वी जयस्वालने टीम इंडिात पदार्पण केलं. तिसऱ्या क्रमांकावर हुकमी फलंदाज तिलक वर्माला उतरवण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिवम दुबे, रिंकू सिंह फलंदाजी येतील. विकेटकिपर म्हणून आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा जितेश शर्माची जागा निश्चित मानली जातेय. ऑलराऊंडर म्हणून वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते.
या गोलंदाजांना संधी
वॉशिंग्टन सुंदरशिवाय फिरंकी गोलंदाज म्हणून रवी बिश्नोई संघात असेल. तर वेगावन गोलंदाजीची धुरा अर्धदीप सिंहवर असेल. अर्शदीप सिंहला सिनिअर टीम इंडियामध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत अर्शदीप सिंह टीम इंडियाचा भाग होता. अर्शदीप सिंहला आवेश खान आणइ मुकेश कुमारची साथ मिळेल.
पहिल्या सामन्यात आकाशदीप सिंह, प्रभासिरमन सिंह, शाहबाज अहमद, राहुल त्रिपाठी यांना बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे.
भारताची संभाव्य प्लेईंग 11
ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, आवेश खान, मुकेश कुमार