IND vs AUS: भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. इतकंच नाही तर त्याचं वजन आणि फिटनेसवरून नेहमी त्याच्यावर टीका होताना दिसतात. अशातच नुकंतच सुरु असलेल्या सामन्यात त्याच्या फिटनेसवर त्याला चिडवण्यात आलं. यावेळी या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. 


प्रेक्षकांनी Rohit Sharma ला चिडवलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदूरच्या स्टेडियममध्ये तिसऱ्या वनडे सामना खेळवला जातोय. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 75 रन्सच्या कांगारूंनी दिलेल्या आघाडीनंतर टीम इंडिया फलंदाजीसाठी उतरली. यावेळी शुभमन गिलच्या रूपाने टीम इंडियाला पहिला धक्का बसला. तर त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा देखील अवघ्या 12 रन्सवर माघारी परतला.  


रोहित शर्मा फलंदाजी करत असताना 11 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. 11 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर प्रेक्षकांमधून एक आवाज आला. “अबे ओए वडापाव”, असे शब्द असून हा आवाज व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये देखील कैद झाला आहे. मुळात सोशल मीडियावर रोहित शर्माला 'वडापाव'च्या नावाने ट्रोल करण्यात येतं.



कर्णधार रोहित शर्मासोबत स्लेजिंग


टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma sledged Video) फ्लॉप ठरला. पहिल्या डावाप्रमाणे या डावातंही त्याने केवळ 12 रन्सची खेळी केली. दुसऱ्या डावामध्ये नाथन लियोनचा बॉल सरळ शर्माच्या पॅडवर जाऊन लागला. यावेळी रोहितने फिल्ड अंपायरच्या विरोधात जाऊन डीआरएस घेतला. याचवेळी रोहित आणि चेतेश्वर पुजारा एकत्र उभे असताना ऑस्ट्रेलियाचे खेळाडू नाथन लियोनला घेर करून उभे राहिले. 


अशातच ऑस्ट्रेलियाचा ओपनर ट्रेविस हेड (Travis Head) रोहित शर्मा (Rohit Sharma sledged by Travis Head) जवळ आला आणि जोरजोरात टाळ्या वाजवून निघून गेला. ट्रेविस हेड रोहितला चिडवण्याच्या हेतून आला होता. यानंतर सोशल मीडियावर हेडवर प्रचंड प्रमाणात टीका केली जातेय.