सिडनी : ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय टीमकडे नवा इतिहास रचण्याची संधी आहे. चार सामन्यांच्या सिरीजमध्ये भारत २-१ ने पुढे आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीम चौथा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे. विराट कोलहीच्या कामगिरीमुळे आज तो जगभरात सर्वात श्रेष्ठ क्रिकेटर बनला आहे. अनेक दिग्गक क्रिकेटर त्याचं आज कौतुक करत आहेत. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात त्याचे चाहते आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने जेव्हा भारतीय टीमला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या घरी आमंत्रित केलं होतं. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना टीम इंडियाचा परिचय करुन देण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ऑस्ट्रेलियाच्या खेळमंत्री ब्रिजेट मॅकेंजी यांनी विराट कोहलीला 'क्रिकेट क्रश' म्हटलं आणि स्टेजवर विराटला आमंत्रित केलं. त्यांनी म्हटलं की, मला स्टेजवर त्या व्यक्तीला आमंत्रित करण्यात आनंद होतो आहे जो माझा क्रिकेट क्रश आहे. या दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी देखील विराटचं कौतुक केलं. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी जेव्हा रिषभ पंतसोबत हात मिळवला तेव्हा त्यांनी त्याला लगेच ओळखलं. पंतला भेटून ते खूप खूश झाले. त्यांनी पंतला म्हटलं की, तूच स्लेजिंग केली होतीस ना. पंतने हो म्हणताच त्यांनी म्हटलं की, तुझं प्रत्यूत्तर योग्य होतं. तुझं स्वागत आहे. तू खेळात प्रतिद्वंदी कायम ठेवण्याच काम केलं आहे.