AUS vs ENG: `What A Ball`; स्टार्कच्या या बॉलवर कोणत्याही फलंदाजाची गेली असती विकेट!
AUS vs ENG 2nd ODI : ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला मात्र या सामन्यात मिचेल स्टार्कच्या एका ओव्हरने चांगलाच धुमाकूळ घातला. यामध्ये स्टार्कने जेसन रॉयला शून्यावर आऊट केलं.
AUS vs ENG 2nd ODI: सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney cricket groud) आज ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा वनडे सामना रंगला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 281 रन्सचं टारगेट इंग्लंडला दिलं होतं. मात्र इंग्लंड अवघ्या 208 रन्सवर ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला मात्र या सामन्यात मिचेल स्टार्कच्या एका ओव्हरने चांगलाच धुमाकूळ घातला. यामध्ये स्टार्कने जेसन रॉयला शून्यावर आऊट केलं. यानंतर फॉर्ममध्ये असलेला डेविड मलान देखील शून्यावर पव्हेलियनमध्ये परतला.
मात्र मलान ज्या बॉलवर आऊट झाला, त्या बॉलवर इतर कोणताही फलंदाज असता तरी त्याची विकेट गेली असती. हा पहिल्या ओव्हरमधील 5 चा बॉल होता. ज्यावर मलान बोल्ड आऊट झाला. स्टार्कचा वेग आणि स्विंगच्या पुढे मलानची बॅट तग धरू शकली नाही आणि तो बोल्ड झाला. मुळात स्टार्कचा हा बॉल इतका चांगला होता ही, कोणत्याही फलंदाजासाठी तो खेळण्यास कठीणच असता.
या विकेटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होताना दिसतोय. लोकांनाही स्टार्कची गोलंदाजी फार आवडलीये. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथची बॅट पुन्हा एकदा तळपळी. उत्तम फलंदाजी करत त्याने 94 रन्सची खेळी केली. स्मिथ सिक्स लगावून त्याची सेंच्युरी पूर्ण करण्याच्या विचारात होता मात्र बाऊंड्री लाईनच्या इथे तो कॅच आऊट झाला.
स्मिथशिवाय या सामन्यात कांगारू टीमसाठी मार्नस लॅबुशेन आणि मिचेल मार्श यांनीही अर्धशतकं झळकावली. यांनी उत्तम खेळी करत टीमला 280 पर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र संपूर्ण इंग्लंडची टीम 208 रन्सवर पव्हेलियममध्ये परतली. 3 वनडे सामन्यांच्या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने दोन सामने जिंकून सिरीजही जिंकलीये.