Glenn Maxwell Catch : पापणी पण लवली नाय अन् मॅक्सवेलने घेतला खतरनाक कॅच; पाहा Video
Glenn Maxwell Catch Video : विराट कोहलीसोबत चांगली पार्टनरशीप केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनचं टेन्शन वाढलं होतं. त्याचवेळी कमिन्सने गोलंदाजीत सुधारणा केली अन् मॅक्सवेलच्या हातात बॉल सोपवला.
IND vs AUS, Rohit Sharma Wicket : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली. ग्लेन मॅक्सवेलच्या बॉलिंगवर रोहित शर्मा (Rohit Sharma Wicket) बाद झाला. त्यावेळी मॅक्सवेलचा कॅच (Glenn Maxwell Catch) पाहून खुद्द मॅक्सी देखील शॉक झालाय. सेकंदात होत्याचं नव्हतं झालं असतं. मात्र, दररोजच्या सरावाने मॅक्सवेल थोडक्यात वाचला आहे. त्याचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
झालं असं की, रोहित शर्माने वॉशिंग्टन सुंदर याच्यासोबत पहिल्या 10 ओव्हर चोपून काढल्या. त्यानंतर विराट कोहलीसोबत चांगली पार्टनरशीप केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनचं टेन्शन वाढलं होतं. त्याचवेळी कमिन्सने गोलंदाजीत सुधारणा केली अन् मॅक्सवेलच्या हातात बॉल सोपवला. मॅक्सीने धारदार गोलंदाजी केली. 21 व्या ओव्हरमध्ये मॅक्सवेल जेव्हा गोलंदाजीला आला. तेव्हा रोहितने हाणामारी करण्य़ाचं तंत्र शिकून घेतलं होतं. मॅक्सवेलच्या शेवटच्या बॉलवर खेळताना रोहितने स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मॅक्सीने डोळ्याची पापणी लवण्याच्या आत कॅच घेतला.
पाहा Video
भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाचा संघ : मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, तनवीर संघा, जोश हेझलवूड.