AUS vs PAK : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये (AUS vs PAK 2nd Test) सुरू होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) कारवाई बडगा उगारण्यात आला आहे. उस्मान ख्वाजाने आयसीसीची परवानगी न घेता पाकिस्तानविरुद्ध पर्थला झालेल्या कसोटी सामन्यात दंडाला काळी पट्टी (black band on arm) बांधली होती. त्यामुळे आता उस्मान ख्वाजावर निलंबनाची कारवाई होणार की काय? असा सवाल विचारला जातोय. अशातच आता उस्मान ख्वाजा याने थेट आयसीसीविरुद्ध पंगा घेतल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला Usman Khawaja?


मी आयसीसी आणि त्याच्या नियमांचा आदर करतो. या निर्णयाला मी आव्हान देणार आहे. शूजचा मुद्दा वेगळा होता. आर्मबँडबद्दल खरडण्यात काही अर्थ नाही. मी यापूर्वीही सर्व नियमांचे पालन केले आहे. खेळाडू त्यांच्या बॅटवर स्टिकर्स लावतात, बुटांवर नावे लिहितात आणि इतर अनेक गोष्टी आयसीसीच्या परवानगीशिवाय घडतात पण त्यांना फटकारले जात नाही, असं म्हणत ख्वाजाने आयसीसीविरुद्ध पंगा घेतला आहे.


पर्थ कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आयसीसीने मला विचारले होते की मी काळ्या हाताची पट्टी का घातली आहे आणि मी वैयक्तिक शोक केल्यामुळे असे म्हटले होते. मी बाकी काही बोललो नाही, असा खुलासा उस्मान ख्वाजाने म्हटलं आहे. माझा कोणताही अजेंडा नव्हता. मला एका गोष्टीवर प्रकाश टाकायचा होता ज्याचा मी कट्टर समर्थक आहे आणि मी आदरपूर्वक पद्धतीने केलं. मी बऱ्याच काळापासून शूजबद्दल काय लिहावं? याचा विचार करत होतो. आधीपासून मी धर्माला दूर ठेवलंय. मी मानवतेच्या मुद्द्यावर बोलत होतो, असं उस्मान ख्वाजा याने म्हटलं आहे.


आणखी वाचा - IND vs SA Test : कॅप्टन रोहितची खरी 'कसोटी', कोणाला मिळणार संधी? पाहा संभाव्य प्लेईंग इलेव्हन


दरम्यान, उस्मानने क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसीची परवानगी न घेता पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वैयक्तिक संदेश (हातावर काळी पट्टी) दिला होता. हे इतर उल्लंघन श्रेणीमध्ये येते आणि त्यांना पहिल्या गुन्ह्यासाठी फटकारण्यात आले आहे, अशी माहिती आयसीसीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. उस्मान ख्वाजाने 'ऑल लाइव्स आर इकवल' आणि 'फ्रीडम इज ह्यूमन राइट', असं लिहिलं होतं. त्यामुळे उस्मान ख्वाजा हमासचं समर्थन करत असल्याची चर्चा सुरू झाली होती.