पॅट कमिन्सला इतिहास माफ करणार नाही, द्रविडसारखी केली `ती` घोडचूक!
(Aus vs Sa Test) पॅट कमिन्सच्या निर्णयामुळे संघातील सहकारी खेळाडू सलामीवीर उस्मान ख्वाजा मोठं शिखर गाठण्यापासून राहिला दूर!
Aus vs Sa : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (Aus vs Sa Test) सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये कर्णधार पॅट कमिन्सने मोठी चूक केली आहे. कमिन्सच्या करिअरमध्ये हा एक डाग लागला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पॅट कमिन्सच्या निर्णयामुळे संघातील सहकारी खेळाडू सलामीवीर उस्मान ख्वाजा मोठं शिखर गाठण्यापासून दूर राहिला आहे. (Aus vs sa Usman Khawaja Misse Double Century Because Pat Cummins Declared Innings Latest Marathi Sport News)
पॅट कमिन्सने नेमकं काय केलं?
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनीच्या मैदानावर खेळवला जात आहे. सामन्यात पहिल्या दिवसापासून अडचणी आल्याचं दिसलं. पहिले दोन दिवस पाऊस आणि खराब प्रकाशामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला आणि तिसऱ्या दिवशी खेळ झाला नाही.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने पहिल्या दोन दिवसात खेळपट्टीवर टिकून होता. उस्मान शिस्तबद्ध बॅटींगच्या जोरावर 195 धावांवर पोहोचला होता. चौथ्या दिवशी ख्वाजाला पहिलं द्विशतक पूर्ण करण्यासाठी 5 धावा दूर होता. मात्र पॅट कमिन्सने दुसऱ्या 475/4 धावसंख्येवर डाव घोषित केला.
कमिन्सच्या या निर्णयामुळे त्याच्यावर क्रीडा विश्वातील चाहते टीका करत आहेत. ख्वाजाही निराश झालेला दिसला. महत्त्वाचं म्हणजे ख्वाजाने याच मैदानावर 2011 मध्ये इंग्लंडविरूद्ध पदार्पण केलं होतं. मुळचा पाकिस्तानमधील इस्लामाबादचा जन्म असलेल्या ख्वाजाचं त्याच्या कारकिर्दीतील पहिलं द्विशतक पूर्ण झालं नाही. ख्वाजाने एकूण 13 शतके केली तर 19 अर्धशतके केली आहेत. 119 धावांवर जीवदान मिळालेल्या ख्वाजाने नंतर कोणतीही चूक केली नाही. परंतु कमिन्स असा निर्णय घेत त्याच्यावर अन्याय करेल असा विचारही त्याने केला नसावा.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 475 धावांवर घोषित केला आहे. आफ्रिकेचे 3 गडी बाद झाले असून आता मैदानात टेम्बा बावूमा आणि खाया झोंडो हे मैदानात आहेत. आफ्रिका 418 धावांनी पिछाडीवर आहेत. याआधी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी 29 मार्च 2004 मध्ये असाच निर्णय घेतला होता. त्यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाकिस्तानविरुद्ध मुलतान कसोटीत 194 धावांवर खेळत होता आणि कर्णधार द्रविडने डाव घोषित केला होता.