बर्मिंगहम : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २९२ धावांचे आव्हान ठेवलेय. ऑस्ट्रेलियाला हे आव्हान ४६ षटकांत पूर्ण करायचेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात पावसाचा व्यत्यत आल्याने सामना ४६ षटकांचा खेळवण्यात येतोय. न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केन विल्यमसन्सचे शतक, ल्युके राँचीच्या ६५ आणि रॉस टेलरच्या ४६ धावांच्या जोरावर न्यूझीलंडला २९१ धावा करता आल्या.


विल्यमसन्सने ९७ चेंडूत शतक साकारले. यात ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. विल्यमसन्सला चांगली साथ दिली ती ल्युके राँचीने. त्याने ४३ चेंडूत ६५ धावा केल्या.