नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम १७ सप्टेंबरपासून भारत दौ-यावर येत आहे. या दौ-यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या टीमची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१७ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबरपर्यंत ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर असणार आहे. या दौ-यात ऑस्ट्रेलियन टीम वन-डे आणि टी-२० मॅचेस खेळणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या दोन्ही टीम्सची घोषणा केली आहे. 


कर्णधार स्टीव्ह स्मिथकडेच वनडे आणि टी-२० टीम्सचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. तर डेव्हिड वॉर्नर उपकर्णधार असणार आहे. यासोबतच ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीत भाग घेतलेल्या टीममध्ये पाच महत्वाचे बदलही केले आहेत. मात्र, या दौ-यासाठी बीसीसीआयनं वेळापत्रक आणि जागेची घोषणा अद्याप केलेली नाहीये.


ऑलराऊंडर जेम्स फॉकनर याचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, फास्ट बॉलर मिशेल स्टार्क हा पायाच्या दुखापतीमुळे या दौ-यात सहभागी नसणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन टीममधील मोजिज हेनरीकेसचाही टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाहीये. तसेच, क्रिस लिन, जेम्स पॅटिंनसन, जॉन हेस्टिंग्स आणि मिशेल स्टार्क यांनाही टीममधून वगळण्यात आलं आहे. 


ऑस्ट्रेलिया वन-डे टीम :


स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, एशटन आगर, हिल्टन कार्टराइट, नॅथन कुल्टर नाइल, पॅट कमिन्स, जेम्स फॉकनर, अरॉन फिंच, जॉश हेजलवूड, ट्रेविस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड (विकेटकिपर), अॅडम झम्पा


ऑस्ट्रेलिया टी-२० टीम :


स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जेसन बेहर्नडॉर्फ, डेन ख्रिस्टयन, नॅथन कुल्टर नाइल, पॅट कमिन्स, अरॉन फिंच, ट्रेविस हेड, मोएसिज हेन्रीकेज, ग्लेन मॅक्सवेल, टीम पेन (विकेटकिपर), केन रिचर्डसन, अॅडम झम्पा