Mohammed Shami Wife Hasin Jahan On India Lost World Cup 2023: वर्ल्ड कपच्या शेवटच्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर भारतीय चाहते निराश झाले आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यासारख्या खेळाडूंना रविवारी ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप फायलन 6 विकेट्सने जिंकल्यानंतर मैदानातच अश्रू अनावर झाले. भारताच्या या अनपेक्षित पराभवामुळे अनेकांना धक्का बसला असून त्यामधून सावरण्याचा प्रयत्न खेळाडूंबरोबरच चाहतेही करत आहेत. दरम्यान या वर्ल्ड कपमध्ये भन्नाट गोलंदाजी करत सर्वांनाच आश्चर्याचा देणारा मोहम्मद शामीही मान खाली घालूनच अंतिम सामन्यानंतर मैदानातून बाहेर पडला. आता मोहम्मद शामीची पत्नी हसीन जहाँने सोशल मीडियावरुन एक पोस्ट करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.


शमीच्या खासगी आयुष्यात गोंधळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शमीचं प्रोफेशनल लाईफ जितकं भन्नाट सुरु आहे त्या उलट त्याच्या खासगी आयुष्यामध्ये गोंधळ सुरु आहे. मोहम्मद शामी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ या दोघांमध्ये झालेला वाद हा जगजाहीर आहे. दोघांमध्येही मागील बऱ्याच काळापासून वाद सुरु आहे. दोघांमध्ये सध्या कायदेशीर वाद सुरु आहे मात्र या दोघांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. मात्र दोघेही एकत्र न राहता वेगवेगळे राहतात. वर्ल्ड कपदरम्यानही अनेकदा हसीन जहाँने मोहम्मद शमीवर टीका केल्याचं पाहायला मिळालं. मात्र पराभवानंतर हसीन जहाँने केलेली पोस्ट चर्चेत आहे.


नक्की वाचा >> 'मला घाणेरडे...'; ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर मॅक्सवेलची भारतीय वंशाची पत्नी संतापली


भारत राहल्यानंतर काय म्हणाली हसीन जहाँ?


भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर हसीन जहाँने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये हसीन जहाँ फार उदास दिसत आहे. बॅकग्राऊण्डला एका चित्रपटाचा संवाद ऐकू येत असून हसीन जहाँ आपल्या भावना या संवादातील शब्दांमधूनच व्यक्त करत आहे. "कितीही दु:ख येवो. कितीही संकटे येवोत. कितीही चढ उतार आले तरी शेवटी चांगले लोक नक्कीच जिंकतात," असं हसीन जहाँने शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे. 'कितने भी दुख आएं, कितने भी गम आएं, कितनी ऊंचाई आए और कितनी भी निचाई आए, आखिर में अच्छे लोग जरूर जीतते हैं,' या ओळी हसीन जहाँच्या व्हिडीओमध्ये ऐकू येत आहेत.



मोदींनी शमीला मारली मिठी


भारताचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधानांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंना धीर दिला. मोदींचा भारतीय ड्रेसिंग रुममधील फोटो मोहम्मद शमीने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट केला. शमीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी शमीला मिठी मारताना दिसत आहेत. मोदी कौतुकाने शमीला शब्बासकी देतानाच त्याला धीर देत असल्याचं फोटोत दिसत आहे. हा फोटो शेअर करताना, "दुर्देवाने कालचा दिवस आमचा नव्हता. संपूर्ण स्पर्धेमध्ये मला आणि आपल्या संघाला पाठिंबा देणाऱ्या सर्व भारतीयांचे मी आभार मानतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानतो जे स्पेशली ड्रेसिंग रुममध्ये आले आणि त्यांनी आमचं मनोधैर्य वाढवलं. आम्ही नक्कीच पुन्हा दमदार पुनरागमन करु" असं शमीने म्हटलं आहे.


नक्की वाचा >> '..तेव्हा भारतीय चाहते शांत का होते?' आफ्रिदीचा सवाल; संतापून म्हणाला, 'कथित सुशिक्षित..'



भारताचा 6 विकेट्सने पराभव करुन ऑस्ट्रेलियन संघ 6 व्यांदा विश्वविजेता ठरला. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, अॅशेज आणि टी-20 वर्ल्ड कपही जिंकला आहे.