Shane Warne Marathi Sport News : आपल्या फिरकीवर फलंदाजांच्या दांड्या गुल करणारा ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू शेन वॉर्नच्या (shane warne) सन्मानार्थ ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने (Australia Cricket Board) मोठा निर्णय घेतला आहे. क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आता महान खेळाडू शेन वॉर्न यांच्या नावाने दिला जाणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. (australia cricket board decision honor of shane warne changed name best men cricketer test award latest marathi Sport news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या 'बॉक्सिंग डे' कसोटीआधी हा निर्णय घेण्यात आला आहे. 'टेस्ट प्लेयर ऑफ द इयर' हा पुरस्कार आता 'शेन वॉर्न टेस्ट प्लेयर ऑफ द इयर' म्हणून ओळखला जाणार आहे. शेन वॉर्ननेही पुरस्कार पटकावला होता, 2005 मध्ये शेनने  ऍशेस मालिकेत इंग्लंडविरूद्ध 40 विकेट्स घेतल्या होत्या. 


ऑस्ट्रेलियाने शेन वॉर्नच्या फिरकीच्या जोरावर 1999 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. फायनल सामन्यात वॉर्नने 33 धावांवर पाकिस्तानच्या 4 फलंदाजांना बाद केलं होतं. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अवघ्या 132 धावांवर संघ ऑल आऊट झाला होता. तो सामना ऑस्ट्रेलियाने जिंकत वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं होतं. वॉर्नला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं. 


 



दरम्यान, यंदा वॉर्नच्या नावाने हा पुरस्कार दिला जाणार असून पहिला पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाचे उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन आणि नॅथन लियॉन हे यंदा या पुरस्काराचे प्रबळ दावेदार आहेत. मार्नस लाबुशेनने 8 कसोटीमध्ये 867 धावा, तर ख्वाजाने  824 धावा केल्या आहेत.