२१ धावांनी ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय
भारताविरूद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाचा एकूण पाच सामन्यांच्या मालिकेतील हा पहिलाच विजय आहे.
बंगळुरू : भारताविरूद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी विजय मिळवला आहे. एकूण पाच सामन्यांच्या मालिकेतील ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच विजय आहे.
या सामन्यातील पराभवामुळे ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले. सलामीवीर अजिंक्य रहाणे(५३), केदार जाधव(६७) आणि रोहित शर्मा(६५) यांच्या अर्धशतकी खेळी वाया गेल्या. ५० षटकांत भारताला ८ गड्यांच्या मोबदल्यात ३१३ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून रिचर्डसनने सर्वाधिक ३ बळी मिळवले, तर नॅथन कॉल्टरने २ बळी मिळवले.
याआधी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करत भारतासमोर ३३५ धावांचे लक्ष ठेवले होते. या लक्षाचा पाटलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने अश्वास सुरूवात केली. ओपनींगसाठी मैदानात उतरत अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या जोडीने चांगली फटकेबाजी करत डावाला आकार देण्याचे काम केले. डावाला आकार देताना दोघांनीही आपली अर्धशतके पूर्ण केली. रहाणेने ५८ चेंडू ५० धावा तर, रोहितने ४२ चेंडूत अर्धशतक झळकावले. दरम्यान, रहाणे ५३ धावांवर परतला तर, शर्मा ६५ वर बाद झाला. या वेळी शर्मानंतर आलेल्या विराटचे विकेट लगेच पडली. तो २२ धावांवर बाद झाला. त्यामुळे सामना सावरण्याची जबाबदारी हार्दिक पांड्यावर येऊन पडली.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूपैकी वॉर्नर आणि फिंच या जोडीने ३५ षटकांमध्ये २३१ धावांची भागिदारी केली. तर उर्वरित खेळाडूंनी निर्धारित ५० षटकांमध्ये पाच गडी बाद ३३४ धावा ठोकल्या.