मुंबई : क्रिकेटपटू त्यांच्या शानदार कामगिरीसाठी नेहमीच चर्चेत असतात. तसेच ते त्यांच्या खासगी आयुष्यात काय करतात, यासाठीही चर्चेत असतात. क्रिकेटपटू हे मैदानात सामन्यादरम्यान होणाऱ्या वादात अडकतात. तसेच मैदानाबाहेरील होणाऱ्या वादातही अडकतात. अशाच प्रकारे एक दिग्गज क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या क्रिकेटरला मोठ्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. (Australia Former Cricketer michael slater arrested 2nd time big charge know what is reason)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मायकल स्लेटरला (Michael Slater) ऑक्टोबरमध्ये घरहुती हिसांचाराच्या आरोपांचा ठपका ठेवत अटक करण्यात आली. मात्र यानंतर त्याला जामीन मिळाला. मात्र आज 15 डिसेंबरला त्याला न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. 


या माजी क्रिकेटरने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केला आहे. ज्याला हिंसेचा आदेश किंवा AVO असंही म्हंटलं जातं, असं रिपोर्टमध्ये म्हंटलं आहे. 


न्यू साउथ वेल्स पोलिसांनी सांगितलं की,  मायकलला बुधवारी सकाळी दुसऱ्यांदा अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याला सिडनी पोलीस चौकीत नेण्यात आलं. जिथे मायकलला जामीन देण्यास नकार देण्यात आला. कारण त्यादिवशी मायकलला न्यायलयात हजर व्हायचं होतं. 


ऑस्ट्रेलियातील माध्यमांनुसार, पोलिसांनी सांगितलं की मायकलवर प्रतिंबंधांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ऑक्टोबर महिन्यात एका कथित प्रकरणी पोलिसांनी मायकलला अटक केली होती. यानंतर त्याला न्यायलयात हजर केलं होतं. मायकलला या प्रकरणामुळे 2021-22 या मोसमासाठी समालोचन पॅनेलमधून वगळण्यात आलं होतं. 


मायकल स्लेटरने ऑस्ट्रेलियासाठी तब्बल 10 वर्ष क्रिकेट खेळला. कसोटीत त्याने 5 हजार 312 धावा केल्या आहेत. मायकलने 2004 मध्ये क्रिकेटला रामराम ठोकला होता. निवृत्तीनंतर मायकलने कॉमेंट्रीकडे मोर्चा वळवला.