मुंबई  : विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2021) कॅप्ट्न्सी (Captaincy) सोडणार असल्याचं जाहीर केलं. विराटच्या या निर्णयावर अनेक दिग्गज आजी माजी क्रिकेटर प्रतिक्रिया देत आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी चायनामॅन गोलंदाज ब्रॅड हॉगनेही (Brad Hogg) प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटचं लक्ष हे आता सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) शतकांच्या विक्रमांवर आहे. या विक्रमावर लक्ष केंद्रीत करण्याच्या उद्देशाने विराटने आयपीएल आणि टीम इंडियाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं हॉगने म्हंटलंय. क्रिकेट विश्वात आपलं नाव अजरामर करायचं असेल, तर कसोटीमध्ये आणखी विक्रम करावे लागतील आणि याबाबत विराटला माहिती आहे, असंही हॉगने स्पष्ट केलं. हॉग त्याच्या यूट्युब चॅनेलवर बोलत होता. (australia former spinner brad hogg reaction on virat kohli captaincy over to sachin tendulkar record)


हॉग काय म्हणाला?


"विराटचं कर्णधारपद सोडण्यामागे काहीतरी मोठी योजना आहे. विराट आता कसोटी क्रिकेटकडे जास्त लक्ष केंद्रीत करु इच्छितो. विराट वनडे आणि कसलोटी संघाचं नेतृत्व करणार आहे. पण त्याचा एका विक्रमावर डोळा असणार आहे. तो रेकॉर्ड म्हणजे सचिनच्या शतकांचा शतकाचा रेकॉर्ड",असं हॉगने स्पष्ट केलं.


"विराटच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये 43 शतकांची नोंद आहे. यासह विराट शतकांबाबत सचिनच्या जवळ आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये विराटने 27 शतक केले आहेत. तर सचिनच्या नावे 200 कसोटीत 51 शतकांची नोदं आहे.मला वाटतं की विराटचं आता कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याचं ध्येय आहे. सोबत सचिनच्या शतकाच्या विक्रमाजवळ पोहचण्याचा मानस विराटचा असेल. विराटचं हेच ध्येय कर्णधारपदावरुन पायउतार होण्यामागचं अनेक कारणांपैकी एक कारण आहे", असं हॉगने नमूद केलं.


विराटची शतकाची पाटी कोरीच  


कोहलीला 'रनमशीन' म्हणून ओळखलं जातं. मात्र गेल्या काही वर्षांपासून विराटला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. विराटने नोव्हेंबर 2019 पासून आतापर्यंत एकदाही शतक लगावलेलं नाही.


विराटने अखेरचं शतक हे बांगलादेश विरुद्ध डे नाईट कसोटीत लगावलं होतं. मात्र तेव्हापासून विराटच्या चाहत्यांना विराटकडून शतकाची अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण करण्यात विराटला अद्याप यश आलेलं नाही. त्यामुळे विराट शतकाचा दुष्काळ कधी संपवणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. 


कोलकाता विरुद्ध बंगळुरु आमनेसामने 


दरम्यान आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्यातील दुसरा सामना आज (20 सप्टेंबर) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कोलकाता विरुद्ध बंगळुरु आमनेसामने भिडणार आहेत. 


ताज्या आकडेवारीनुसार, बंगळुरु पॉइंट्सटेबलमध्ये 5 विजयासह तिसऱ्या तर कोलकाता 4 पॉइंट्ससह 7व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विराटसेना सामना जिंकून प्लेऑफचा प्रवास आणखी सोपा करणार की कोलकाता मात करणार, याकडे सर्वाचं लक्ष असेल.