South Africa vs Australia 2nd Semi-final : साऊथ अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (SA vs AUS) यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा दुसरा सेमीफायनल सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने साऊथ अफ्रिकेचा 3 विकेट्सने पराभव केला आहे. साऊथ अफ्रिकेने डेव्हिड मिलरच्या शतकीय खेळीच्या जोरावर 212 धावा उभ्या केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर फायनलमध्ये (Australia Into the Final) जाण्यासाठी 213 धावांचं आव्हान पार करण्याची गरज होती. मात्र, साऊथ अफ्रिकेच्या गोलंदाजांनी कांगारूंना प्रत्येक धावेसाठी झुंजवलं अन् ऑस्ट्रेलियाने 16 बॉल राखून सामना जिंकला. सेमीफायनलमधील पराभवानंतर साऊथ अफ्रिका पुन्हा एकदा चोकर्स ठरली आहे. आता येत्या 19 नोव्हेंबरला फायनलचा सामना (World Cup 2023 Final) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळवला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साऊथ अफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 213 धावांचं किरकोळ आव्हान दिलं होतं. सामना लवकर संपवायचा अन् फायनलचं तिकीट नक्की करायचं, याच विश्वासाने ऑस्ट्रेलियाची टीम मैदानात उतरली. ट्रेविस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांनी 60 धावांची सलामी भागेदारी केली. मात्र, मार्करामने वॉर्नरला तंबूत पाठवलं. तर पुढच्याच ओव्हरमध्ये घातक मिशेल मार्श बाद झाला. आता साऊथ अफ्रिकेला विकेट्सची आणि ऑस्ट्रेलियावर प्रेशर निर्माण करण्याची गरज होती. बावुमाने शम्मी आणि केशव महाराज यांच्या स्पिनचा मारा सुरू ठेवला. 174 वर 6 गडी बाद अशी परिस्थिती ऑस्ट्रेलियाची झाली होती. मात्र, सर्व मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर तळातील फलंदाजांना साऊथ अफ्रिकेने रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऑस्ट्रेलियाने किरकोळ आव्हान कसंबसं पुर्ण केल्याचं दिसून आलं.



दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टॉस जिंकला होता. कॅप्टन टेम्बा बावुमा याने बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी कॅप्टनचा निर्णय चुकीचा ठरवला. दक्षिण आफ्रिकेचे आघाडीचे फलंदाज पत्त्यासारखे कोसळले. मात्र, डेव्हिड मिलर संकटमोचक म्हणून धावून आला. डेव्हिडने एक बाजू लावून धरली अन् साऊथ अफ्रिकेची लाज राखली. टेम्बा बावुमा, क्विंटन डी कॉक, अँडन मार्करम आणि रासी वान डेर डुसेन झटपट बाद झाल्याने साऊथ अफ्रिका अडचणीत सापडली. 24 धावांवर 4 बाद अशी परिस्थिती साऊथ अफ्रिकेची झाली होती. त्यानंतर मिलरने आपल्या अनुभवाची ताकद दाखवली अन् झुंजार शतक ठोकलं. त्याने 116 बॉलमध्ये 101 धावा केल्या. त्यात त्याने 8 फोर आणि 5 सिक्स मारले. क्लासेन याने मिलरला साथ दिली पण 31 ओव्हरमध्ये हेडने त्याला माघारी धाडलं. मिलरने स्कोरबोर्ड कसाबसा 200 पार केला. रबाडाने सिक्स मारला खरा पण साऊथ अफ्रिका 212 धावाच करू शकली. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी 3-3 विकेट्स घेतल्या. तर हेजलवूड आणि हेड यांनी 2-2 गडी बाद केले.



आणखी वाचा - Mitchell Starc ने वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू


दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (W), टेम्बा बावुमा (C), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.


ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (W), पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.