INDvsAUS 4th ODI LIVE : ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, फिंच शून्यावर आऊट
५ मॅचच्या सीरिजमध्ये २-१ अशी स्थिती आहे.
मोहाली : विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिला झटका लागला आहे. कॅप्टन एरॉन फिंच शून्यावर आऊट झाला आहे. भूवनेश्वर कुमारने त्याला बोल्ड केले आहे.
लाईव्ह स्कोअरसाठी क्लिक करा
भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी दिलेल्या ३५९ रन्सचे पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे एरॉन फिंच आणि उस्मान ख्वाजा मैदानात आले आहे. धवन-रोहितच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३५९ रन्सचे तगडे आव्हान देता आले आहे. भारताकडून धवनने सर्वाधिक १४३ रन्सची खेळी केली. गब्बर धवनने धमाकेदार शतक पूर्ण केले आहे. वनडे कारकिर्दीतील धवनचे हे १६ वे शतक ठरले आहे. तर रोहित शर्माने ९५ रन्सची खेळी केली. पहिल्या विकेटसाठी शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यात १९३ रन्सची पार्टनरशिप झाली. भारताची सलामीची जोडी आऊट झाल्यानंतर मधल्या फळीतील विजय शंकर, ऋषभ पंत या दोघांना चांगली सुरावत मिळाली होती. पण त्यांना मोठ्या खेळीत बदल करता आला नाही.
भारत ऑस्ट्रेलियातील चौथी वनडे मॅच मोहीलीतील आय. एस. बिंद्रा स्टे़डिअममध्ये खेळली जात आहे. भारताने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे मध्ये भारताचा ३२ रन्सने पराभव झाला होता. त्यामुळे ५ मॅचच्या सीरिजमध्ये २-१ अशी स्थिती झाली आहे.
चौथ्या वनडेसाठी भारतीय टीममध्ये बदल केले. टीममध्ये धोनीच्या ऐवजी ऋषभ पंतला स्थान देण्यात आले आहे. तर अनेक मॅचपासून निराशाजनक कामिगिरी करत असलेल्या रायुडूऐवजी लोकेश राहुलला संधी मिळाली आहे. रविंद्र जडेजाच्या जागी युजवेंद्र चहाल याला स्थान देण्यात आले आहे. चांगली कामगिरी न करणाऱ्या खेळाडूंना बाहेर बसवून इतर खेळाडूंना संधी देण्यात येईल. अशी प्रतिक्रिया तिसऱ्या मॅचनंतर कोहलीने दिली होती.
चौथी मॅच जिंकून ही सीरिज खिशात घालण्याचा मानस भारताचा असले. तर ही मॅच जिंकून सीरिजमध्ये २-२ अशी बरोबरी करण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाचा असेल.
भारतीय टीम : विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, केदार जाधव, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया टीम : एरॉन फिंच (कॅप्टन), जेसन बेहरनडोर्फ, एलॅक्स कॅरी, पॅट कमिंस, पीटर हैंड्सकॉम्ब, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, एश्टन टर्नर, एडम झॅम्पा.