बर्मिंगहम : पहिल्या दोन सामन्यांत पावसाचा व्यत्यय आल्याने ऑस्ट्रेलियासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलची फेरी गाठणे कठीण झालेय. यातच आज होत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकणे गरजेचे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवल्यास त्यांचे चार गुण होतील. अ गटात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील. 


इंग्लंडने पहिले दोन्ही सामने जिंकत यापूर्वीचे सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. ऑस्ट्रेलियाचे आतापर्यंत दोन सामने झालेत मात्र दोन्ही सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे ते रद्द झाले. 


यामुळे ऑस्ट्रेलियाचे आतापर्यंत दोन गुण झालेत. यामुळे सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांच्यासाठी आजचा सामना करो वा मरो आहे.