T20 World Cup: आयपीएल संपल्यानंतर टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. 2 जूनपासून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यासाठी वनडे वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये एक मोठा बदल करण्यात आलाय. वनडे वर्ल्डकप विजेत्या टीमच्या कर्णधाराला हटवण्यात आलं असून दुसऱ्या खेळाडूकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे. 


पॅट कमिंसला कर्णधारपदावरून हटवलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने 1 मे रोजी जून 2024 पासून सुरू होणाऱ्या T20 वर्ल्डकपसाठी 15 सदस्यीय टीमची घोषणा केली. यावेळी पॅट कमिंसचा टीममध्ये समावेश कऱण्यात आला आहे. मात्र त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आलेली नाही. मिचेल मार्श टी-20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमचं नेतृत्व करणार आहे.


स्टिव्ह स्मिथला टीममधून वगळलं


ऑस्ट्रेलियाने दशकभरात पहिल्यांदाच पुरुषांच्या वर्ल्डकप टीमतून स्टीव्ह स्मिथला वगळलंय. तर दुसरीकडे जेक फ्रेझर-मॅकगर्क देखील वर्ल्डकपच्या टीममध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. स्टीव्ह स्मिथने 2014 पासून खेळल्या गेलेल्या सर्व वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2015 (ODI), 2023 (ODI) आणि 2021 (T20) चा वर्ल्डकप जिंकला आहे.


2022 च्या टी-20 वर्ल्डकपनंतर स्मिथ केवळ एकच टी-20 सामना खेळला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्या जागी ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस आणि टीम डेव्हिडला मिडल ऑर्डरमध्ये स्थान दिलं. स्मिथ आयपीएलमध्येही देखील अनसोल्ड राहिला होता.


दीड वर्षानंतर ग्रीनचं कमबॅक


टी-20 साठी वर्ल्डकपच्या टीमची घोषणा करण्यात आली असून ॲश्टन अगर आणि कॅमेरून ग्रीन टीममध्ये आहेत. जवळपास 18 महिने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट न खेळाताही ऑस्ट्रेलियाच्या टीम मॅनेजमेंटने या वेस्टर्न ऑस्ट्रेलियन जोडीची निवड केली. गेल्या 12 महिन्यांपासून अंतरिम आधारावर T20 संघाचे नेतृत्व करणाऱ्या मिचेल मार्शची अखेर कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलीये.


टी-20 वर्ल्डकपसाठी कशी असेल ऑस्ट्रेलियाची टीम


मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन अगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झम्पा.