पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलिया संघाच्या या खेळाडुला जीवे मारण्याची धमकी
४ मार्चपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानात दाखल झाला आहे. 24 वर्षांनंतर कांगारू संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेलाय. पण आता पाकिस्तानात पोहोचलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या एका खेळाडूला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची बातमी समोर येत आहे. या खेळाडूने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे तक्रार केली आहे. पीसीबीने दावा केला की त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाला कडेकोट सुरक्षा दिली आहे.

पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी सर्व संघ काळजीपूर्वक विचार करतात. कारण आजही सुरक्षेबाबत प्रत्येकाच्या मनात प्रश्नचिन्ह आहेत. असे असतानाही ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा फिरकीपटू अॅश्टन अगरच्या साथीदाराला सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.
क्रिकेटपटूने पाकिस्तानात जाऊ नये, असा धमकीचा संदेश अॅश्टन अगरच्या साथीदाराला मिळाला आहे. द सिडनी मॉर्निंग हेराल्ड आणि द एजमध्ये एगरची जोडीदार मॅडेलीनला मिळालेला संदेश आहे. त्याची तक्रार क्रिकेट ऑस्ट्रेलिया सीए आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीकडे करण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू आहे.
1998 मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. त्यानंतर आता बऱ्याच कालावधीनंतर कांगारू संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. संघाच्या प्रवक्त्याने पुष्टी केली आहे की अॅश्टन एगरला धमक्या मिळाल्या आहेत, परंतु संघाच्या सुरक्षेने तपास केला आहे आणि असे आढळले आहे की हा गंभीर धोका नाही. बनावट इंस्टाग्राम खात्यावरून तो मॅसेज पाठवण्यात आला आहे.
गेल्या वर्षी, न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव सामन्याच्या काही तास आधी पाकिस्तान दौरा रद्द केला आणि एकही सामना न खेळता मायदेशी परतला. आता कांगारू संघ हे प्रकरण कसे हाताळतो हे पाहायचे आहे.