मुंबई : अंडर १९ वर्ल्ड कप २०१८मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार जेसन जरकिरत सिंग संघा हा इंटरनेटवरील तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत होता. त्याचे नाव हे त्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. त्याच्या नावावरून शोध घेतला असता त्याच्या पूर्वजांची भारतासोबत असलेल्या नात्याची वीण उसवत जाते.


भारतीय वंशाचा जेसन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेसन जरकिरत सिंग संघा हा आज जरी ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व करत असला तरी, त्याचे मूळ भारतातील आहे. त्याचे वडील हे सुद्धा भारतीय वंशाचे आहेत. त्यांच्या ऑस्ट्रेलियाई आणि भारतीय नात्याचीही एक कहाणीच आहे. जी एखाद्या कादंबरी किंवा नाटकाचे, सिनेमाची कथा ठरावी अशी.


शेतीसाठी ऑस्ट्रेलियाची धरली वाट


जेसन जरकिरत सिंग संघाच्या वडीलांचे नाव कुलदीप.  त्यांचा जन्म पंजाबमधील नवानसाहार इथल्या लोधीपूर गावात झाला. तर, जसनची आई सिल्वासा हिचे आजोबा राम सिंग हे मुळत: धडपड्या माणूस. तेव्हा भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्या काळात राम सिंग गेले ऑस्ट्रेलियाला. तेही शेती करण्यासाठी. ते दशक होते १९२०चे. विशेष असे की, त्यांच्या पुढच्या पिढ्याही तेथेच स्थायिक झाल्या. कुलदीप हे सुद्धा साधारण शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातच रमले. ते उत्कृष्ट अॅथलीटही होते. शेतीसोबत खेळाची आवड जोपासून क्रीडा क्षेत्रात नाव मिळवायचे त्यांचे स्वप्न होते. पण, शेती प्रमाणे त्यांना खेळाचे गणीत जमले नाही. त्यांचे हे त्याचे स्वप्न त्यांचा मुलगा जेसन पूर्ण करत आहे.


आई वडील चालवतात हॉटेल


डिसेंबर महिन्यात जेनसनची अंडर १९ संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. त्यानंतर कुलदीप आणि सल्वासा यांचे न्यू कॅसल येथील घर नातेवाईक आणि शुभेच्छा पत्रांनी भरून गेले. जेनस हा ऑस्ट्रेलियन संघाचे नृत्वत्व करणारा भारतीय वंशाचा पहिलाच खेळाडू आहे. दरम्यान, सिल्वासा आणि कुलदीप न्यू कॅसलमध्ये 'राज कॉर्नर्स' नावाचे हॉटेल चालवतात. मूलगा जेसनला क्रिकेट क्षेत्रात उत्तूंग भरारी घेताना पाहण्याची त्यांची इच्छा आहे.