मुंबई : चेंडू कुरतडल्याप्रकरणी वादात अडकलेली ऑस्ट्रेलियन टीमला सध्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, याच संकटाच्या काळात ऑस्ट्रेलियन टीमसाठी भारतीय मैदानातून एक आनंदाची बातमी आली आहे. पाहूयात काय आहे ही आनंदाची बातमी...


रचला नवा इतिहास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट टीमने टी-२० आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. शनिवारी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर महिलांनी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठा स्कोअर उभा करत इंग्लंडच्या टीमला पराभवाची धूळ चारली आहे.


सीरिजही आपल्या नावावर


इंग्लंडच्या टीमवर विजय मिळवत ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट टीमने टी-२० ट्राय सीरिजही आपल्या नावावर केली आहे.


२००चा आकडा पार...


मुंबईतील ब्रेबॉर्न स्टिडिअममध्ये खेळण्यात आलेल्या टी-२० ट्राय सीरिजच्या फायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन टीमने ४ विकेट्स गमावत २०९ केले. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही दुसरी वेळ आहे ज्यावेळी एखाद्या टीमने २०० रन्सचा आकडा पार केला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकन टीमने २०१० मध्ये नेदरलँड्सच्या टीम विरोधात १ विकेट गमावत २०५ रन्स बनवले होते.


क्रिकेटमध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड


ऑस्ट्रेलियन इनिंगमध्ये एकूण ३२ फोर मारण्यात आले आणि हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्येही इतके फोर अद्याप मारण्यात आलेले नाहीयेत. यापूर्वी श्रीलंकन पुरुष टीमने जोहान्सबर्गमध्ये केनिया विरोधात खेळताना टी-२० वर्ल्डकपमध्ये २००७ रोजी ३० फोर मारले होते.


ऑस्ट्रेलियन टीमच्या तुफानी इनिंगमध्ये मेग लॅनिंगने ४५ बॉल्समध्ये नॉट आऊट ८८ रन्स केले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट टूर्नामेंटमधील फायनलमध्ये हा एका बॅट्समनचा  सर्वोत्तम स्कोअर आहे. पुरुषांच्या टीममधीलही एकाही खेळाडूने फायनलमध्ये इतके रन्स केले नाहीयेत.