अडीच तासाच्या फलंदाजीत पीटर हँडस्काँबचं घटलं साडेचार किलो वजन
वजन घटवण्यासाठी डाएट आणि व्यायाम करूनही अनेकांचे वजन आटोक्यात राहत नाही. पण सध्या सुमारे अडीच तास क्रिकेटच्या खेळपट्टीवर फलंदाजी करताना पीटर हँटस्काँब या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे मात्र तब्बल साडेचार किलो वजन कमी केले आहे.
बांग्लादेश : डाएट आणि व्यायाम करूनही अनेकांचे वजन आटोक्यात राहत नाही. पण ऑस्ट्रेलियन खेळाडू पीटर हँटस्काँबसोबत असं घडलयं. खेळपट्टीवर फलंदाजी करताना पीटरचे वजन तब्बल साडेचार किलोने घटलयं.
बांग्लादेशविरूद्ध रणरणत्या उन्हात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंची चांगलीच दमछाक होत आहे. सध्या चितगाव येथील तापमान ३० अंशावर पोहचले आहे. त्यामुळे खेळाडूंना वातावरणातील आर्द्रतेमुळे डीहायड्रेशनचा त्रास होत आहे.
कडक उन्हांतही पीटर हँटस्काँबने हार न मानता खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला. खेळादरम्यान लहान लहान ब्रेक्स घेऊन तो पाणी पित होता. अशाप्रकारे त्याने अडीच तासात ११३ बॉल्समध्ये ६९ धावांची नाबाद खेळी केली.
बांगलादेशविरुद्ध चितगांव येथे खेळण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंची चांगलीच दमछाक होत आहे. एकीकडे बांगलादेशविरुद्धची पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाच्या संघाने गमावली आहे. आयसीसी क्रमवारीत आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकणं महत्वाचे आहे. तर दुसरीकडे बांग्लादेशातील रणरणतं ऊन खेळाडूंना त्रासदायक ठरत आहे.
ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू डिन जोन्स यांनीही आपल्या कारकिर्दीत, भारताविरुद्ध १९८६ साली मद्रास कसोटीत अशाच कडाक्याच्या उन्हाळ्यात फलंदाजी केली होती. पीटरच्या या खेळीनंतर त्यांनीही ट्विटरवरुन त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.