वँडरर्स : द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात द. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार कामगिरी करताना विजयाच्या दिशेने पाऊल टाकलेय. तिसऱ्या दिवशी द. आफ्रिकाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला २२१ धावांवर रोखले. आफ्रिकेने पहिल्या डावात ४८८ धावा केल्या. त्यांना पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर २६७ धावांची आघाडी मिळालीये.


सामन्यादरम्यान झाली होती दुखापत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अद्याप हा सामना सुरु असून निकाल बाकी आहे. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नवा कर्णधार टीम पेनने केलेल्या तडाखेबंद खेळीने साऱ्यांचीच मने जिंकली. खरंतर सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी टीम पेनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता. मात्र तुटलेल्या अंगठ्यासह त्याने फलंदाजी केली. इतकंच नव्हे तर टीम पेन बराच काळ मैदानावर टिकून राहत त्याने अर्धशतक ठोकले. 


रविवारी सकाळी टीम पेनने ५ धावसंख्येवरुन डावास सुरुवात केली. त्यावेळी टीम पेन इतका वेळ धावपट्टीवर टिकेल असे कोणासही वाटले नव्हते. मात्र टीमने खेळपट्टीवर टिकून राहत पॅट क्युमिन्ससह ९९ धावांची शानदार भागीदारी केली. पेनने जबरदस्त खेळ करत ६२ धावांची खेळी केली. 


निराशेतून बाहेर येण्यासाठी खेळभावना आवश्यक


कर्णधार दिवसाचा खेळ संपल्यानंतर म्हणाला, गेल्या काही दिवसांत जे काही घडले त्यामुळे आम्ही निराश झालो होतो. या निराशेतून बाहेर येण्यासाठी मी विचार केला की आम्ही खेळभावना दाखवल्या पाहिजेत आणि बॅटने लढाई लढली पाहिजे.