मुंबई: लहानपणी हौस म्हणून आपण क्रिकेट खेळलेला असतो. पण त्या आठवणी कायम ताज्या तवान्या असतात. क्रिकेट विश्वास सहसा एकाच क्षेत्रात कुणी लग्न केल्याचं विशेष पाहायला मिळत नाही. पण क्रिकेट खेळताना झालेली मैत्री आणि त्यातून फुलणाऱ्या प्रेमाची कहाणीच निराळी होती. आज दोघंही आपल्या देशाकडून क्रिकेट टीममधून खेळत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचा वेगवाग गोलंदाज मिचेल स्टार्क आणि एलिसा हे दोघंही लहानपणीचे मित्र आणि सध्याचे एकमेकांची जीवनसाथी आहेत. आजच्या घडीला स्टार्क ऑस्ट्रेलिया पुरुष संघातून तर त्याची पत्नी एलिसा महिला संघातून क्रिकेट आपल्या देशासाठछी क्रिकेट खेळते. 


दोघांचं जन्म 1990 मध्ये झाला. लहानपणापासून दोघांनाही क्रिकेटची खूप आवड होती. पुढे सिडनी नॉर्थन डिस्ट्रीक क्रिकेट असोसिएशनच्या अंडर 10 टीममधून दोघंही एकत्र क्रिकेट खेळले.


पुढे स्टार्कने वेगवान गोलंदाजीची निवड केली आणि वयाच्या 15 व्या वर्षी हिली विकेटकीपर म्हणून कायम राहिली. दोघांचे मार्ग पुढे वेगवेगळे झाले मात्र मैत्री तुटली नाही आणि प्रेमही संपलं नाही. वयाच्या 15 व्या वर्षीय हिलीने महिला क्रिकेट संघात स्थान मिळवले. 


पुढे या दोघांनी ऑस्ट्रेलिया संघात आपली कामगिरी उत्तम पद्धतीनं बजावली. 2015मध्ये हिली आणि स्टार्क यांनी लग्नगाठ बांधली. जगभरात ही तिसरी जोडी विशेष कारणासाठी ओळखली जाते. या जोडीनं कसोटी सामना खेळला आहे.  2015 मध्ये झालेल्या एशेजमध्ये देखील सहभाग घेतला होता. 


हिलीचे वडील ग्रेग हिली आणि तिचे काका इयान हिली देखील ऑस्ट्रेलिया संघाकडून सामने खेळले आहेत. त्यामुळे एलिसा ही एकमेव क्रिकेटमध्ये येणारी नव्हती तर तिच्या कुटुंबातील अनेक जण या क्षेत्रात होते. आता तर पती-पत्नी दोघंही या क्षेत्रात आहेत.