मॅक्सवेलनं डान्स करता करता विनीला घातली वरमाला, पाहा व्हिडीओ
ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर खेळाडू भारताचा जावई झाला. ग्लॅन मॅक्सवेल आणि विनीचा आधी ख्रिश्चन पद्धतीनं आणि त्यानंतर तामिळ परंपरेनुसार विवाह सोहळा पार पडला.
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर खेळाडू भारताचा जावई झाला. ग्लॅन मॅक्सवेल आणि विनीचा आधी ख्रिश्चन पद्धतीनं आणि त्यानंतर तामिळ परंपरेनुसार विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो आणि काही व्हिडीओ समोर आले आहेत. 27 मार्चला विनी आणि मॅक्सवेल विवाह बंधनात अडकले.
मॅक्सवेल आणि विनी एकमेकांना 2017 पासून डेट करत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी मॅक्सवेलच्या पद्धतीनं विवाह केला होता. मात्र आता तामिळ पद्धतीनं हा विवाह सोहळा पार पडला आहे.
या दोघांच्या लग्नाची तामिळ भाषेतील पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. विनी आणि मॅक्सवेलच्या हळदीचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
मॅक्सवेल एवढा खूश होता की तो वरमाला घालताना डान्स करत होता. वरमाला घालताना बऱ्याचदा नवरदेवाला उचलतात किंवा मुलीला उचलतात. मात्र मॅक्सवेल नाचत असल्याचं पाहून सगळेच थक्क झाले.
मॅक्सवेलनं डान्स करता करता विनीला वरमाला घातली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या दोघांच्या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा आहे.