मेलबर्न : ऑस्ट्रेलिया फास्ट बॉलर जॉन हेस्टिंग्सने शुक्रवारी टेस्ट आणि वनडे क्रिकेटमधून निवॄत्तीची घोषणा केली. ३१ वर्षीय हेस्टिंग आता देशासाठी केवळ टी-२० सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूने हेस्टिंग्सच्या हवाल्याने लिहिले की, ‘चार वेळा खांद्यावर जखम, चार वेळा ऑपरेशन आणि गुडघ्याच्या ऑपरेशनने मला कमजोर केलंय. शरिर आता साथ देत नाहीये. मी जेव्हाही चार वनडे सामन्यांमध्ये किंवा वनडे सामन्यांमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मला असं वाटतं की, मी काहीतरी हरवलंय. हा फार कठिण निर्णय आहे. पण आता मी निर्णय घेतलाय की, मी आता केवळ टी-२० सामने खेळणार आहे’.


हेस्टिंग २०१६ मध्ये वनडे क्रिकेटच्या जागतिक यादीतील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज होता. त्याने यावर्षी १५ सामन्यांमध्ये २९ विकेट घेतल्या. तर त्याने टीमसाठी एकच टेस्ट सामना खेळला आणि एकच विकेट घेतली. तसेच, त्याने टीमकडून २९ वनडे सामने खेळले असून त्यात ४२ विकेट घेतल्या आहेत.


हेस्टिंगने २०१२ मध्ये टेस्टमध्ये पदार्पण केले होते. तर त्याने त्याचा पहिला वनडे सामना २० ऑक्टोबर २०१० मध्ये भारता विरूद्ध खेळला होता. आतापर्यंत त्याने ९ टी-२० सामन्यांमध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व केलं आणि ७ विकेट घेतल्या आहेत.