हा ऑस्ट्रेलियन ब्लॉगर म्हणतो विराट मोहम्मद आमिरला घाबरतो
आधी भारतीय क्रिकेट संघाला `सफाईवाला` आणि त्यानंतर `हू इज सचिन` विचारणार्या ऑस्ट्रेलियन ब्लॉगर पुन्हा विराटच्या फॅन्सना चिथवणारे ट्विट केले आहे.
मुंबई : आधी भारतीय क्रिकेट संघाला 'सफाईवाला' आणि त्यानंतर 'हू इज सचिन' विचारणार्या ऑस्ट्रेलियन ब्लॉगर पुन्हा विराटच्या फॅन्सना चिथवणारे ट्विट केले आहे.
विराट एक फोटो ट्विटरवर अपलोड करताना त्याखाली 'आमिर जेव्हा बॉलिंग करणार हे तुला समजते तेव्हा...' असे कॅप्शन लिहले आहे. पाकिस्तान गोलंदाज मोहम्मद आमिरचा सामना करण्यापूर्वी विराटला भीती वाटते असं दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे.
ट्विटरवर क्रिकेट चाहते या ब्लॉगरचीही फिरकी घेतात. विश्वचषकात पाकिस्तानला भारताविरुद्ध एकही सामना जिंकता आला नाही, असं ट्विट एकानं केलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघानने वर्चस्व गाजवले आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यांत भारताने विजयी कामगिरी केली आहे.