मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा विजय झाला आहे. त्याने स्पेनच्या राफेल नदालचा पराभव केला आहे. नोवाक जोकोविचने राफेल नदालचा  ६-३ , ६-२, ६-३ ने पराभव करत विजय ऑस्ट्रेलियन ओपनवर आपले नाव कोरले आहे. या विजयासोबत हा त्याचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील सातवा विजय ठरला आहे. विशेष म्हणजे जोकोविचचा आता पर्यंत एकदाही ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात पराभव झालेला नाही. सामन्याच्या सुरुवातीपासूनच या दोन्ही खेळांडूमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडू एकमेकांना टक्कर देत होते. मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना सुरु होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 




 


५३ वा सामना


जोकोविच आणि नदाल यांच्यातील हा ५३ वा सामना होता. हे दोन्ही खेळाडू आठवेळा ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात समोरासमोर आले. या दोघांमध्ये आतापर्यंत झालेल्या एकूण सामन्यांपैकी  जोकोविचने  २७ तर नदालने  २५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यांमध्ये नदालचा दबदबा पाहायला मिळाला. पण, त्याच्या खेळीला नोवाकनेही त्याच ताकदीने परतचवून लावलं. आतापर्यंत त्याने  अंतिम सामन्यात ४ वेळा विजेतेपद पटकावले आहे तर, ३ वेळा जोकोविचकडून पराभव स्विकारावा लागला आहे. नदालने जोकोविचच्या विरुद्धात झालेल्या ३ ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला आहे. ग्रँडस्लॅमच्या सर्व प्रकारातील सामन्यांमध्ये ज्योकोविच नदालवर वरचढ ठरला आहे.  नदालने ९ सामन्यात विजय मिळवला असून ५ सामन्यात पराभवाचा सामना केला. ओपनच्या सामन्यांमध्ये आतापर्यंत कधीच दोन खेळाडूंमध्ये इतके सामने झाले नाहीत.


 


२०१२ मध्ये सर्वाधिक वेळ चाललेला सामना


या दोन्ही खेळाडूंमध्ये २०१२ साली खेळल्या गेलेल्या अखेरचा ऑस्ट्रलियन ओपनचा सामना हा तब्बल ५ तास आणि ५३ मिनिटे चालला होता. हा सामना ग्रँडस्लॅम च्या इतिहासातील सर्वाधिक वेळ खेलला गेलेला सामना ठरला होता.  तर टेनिसप्रेमींच्या मते हा अटीतटीचा अंतिम सामना झाला होता. ज्योकोविचने हा अंतिम सामना ७-५ च्या सेटने जिंतक विजेतपद पटकावलं होतं.    


 पार्श्वभूमी 


जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नोवाक जोकोविच २४ व्या वेळेस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. तो १४ वेळा विजेता ठरला आहे. तर ९ वेळा पराभवाचा सामना करावा लागला. शु्क्रवारी झालेल्या उपांत्य सामन्यात जोकोविचने फ्रान्सच्या सीडेस लुकास पॉईलीचा ६-०, ६-२, ६-२ ने पराभव करत अंतिम सामन्यात धडक दिली.जागतिक क्रमवारीत ३० व्या क्रमांकावर असलेल्या लुकासी पाउलीला जोकाविचला केवळ ८५ मिनीटे तग धरता आला.