कर्णधार स्टीव्हन स्मिथ टी-२० सीरिजमधून बाहेर, वॉर्नर करणार नेतृत्व
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसलाय. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ भारताविरुद्धच्या सीरीजमधून बाहेर झालाय.
ऱांची : भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसलाय. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ भारताविरुद्धच्या सीरीजमधून बाहेर झालाय.
खांद्याच्या दुखापतीमुळे कर्णधार स्टीव्हन स्मिथला भारताविरुद्धच्या सामन्यांमध्ये खेळता येणार नाहीये. स्मिथच्या जागी ऑलराऊंडर मार्क्स स्टोनिसला संघात स्थान देण्यात आले आहे. स्मिथला उपचारासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आलेय.
स्मिथला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय़ शनिवारी सकाळी ऑस्ट्रेलियन क्रिकेट काऊंसिलद्वारे घेण्यात आला. स्मिथच्या अनुपस्थितीत डेविड वॉर्नरकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
कर्णधार स्मिथ या सामन्यात खेळणार नसल्याने त्याची उणीव संघात नक्की जाणवेल. दरम्यान, वनडेमध्ये जरी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी साजेशी कामगिरी केली नसली तरी टी-२०मध्ये चित्र नेहमीचं वेगळं असतं. या फॉरमॅटमध्ये कोणताही फलंदाज धोकादायक ठरु शकतो. ऑस्ट्रेलियाकडे ग्लेन मॅक्सवेलसारखा टी-२० विशेषज्ञ आहे. तसेच ट्रेविस हेडही टी-२०मध्ये यशस्वी ठरलाय. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी ही जमेची बाजू ठरु शकते.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडे नॅथन कॉल्टर नाईल, पॅट कमिन्स आणि केन रिचर्डसन सारखे गोलंदाज आहेत. यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
भारताकडून ३८ वर्षीय नेहरा संघात पुनरागमन करतोय. त्याचे पुनरागमन महत्त्वाचे ठरु शकते. नेहरा, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरह या त्रिकुटावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल.
पत्नीच्या आजारामुळे तीन वनडे सामन्यांत खेळू न शकलेला शिखर धवन टी-२०मध्ये सलामीला उतरेल