Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : कोलकाताच्या ईडन गार्डनवर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs RR) यांच्यात आयपीएलचा 31 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात सुनील नारायणने (Sunil Narine) खणखणीत शतक ठोकलं अन् कोलकाताला 200 चा आकडा पार करून दिला. कोलकाताची सुरूवात मात्र चांगली झाली नाही. कोलकाताचा सलामीवीर फिलिप सॉल्ट लवकर बाद झाला. आवेश खान (Avesh Khan) याच्या एका भन्नाट कॅचमुळे राजस्थानला पहिली विकेट मिळाली. समोरच्या दिशेने जात असलेला बॉलला आवेशने एका हातात पकडलं. त्यावेळी त्याने संजूचे ग्लोव्हज काढले अन् खास सेलिब्रेशन केलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय झालं?


शेवटच्या सामन्यात संजू सॅमसन आणि आवेश खान यांच्यात एका कॅचवरून खडाजंगी झाली होती. कॅच सुटल्यामुळे संजू आवेश खानवर नाराज झाला होता. त्यावेळी बोलताना संजूने, मला माझ्या वेगवान गोलंदाजांना सांगण्याची गरज आहे की, ग्लोव्हजसह पकडणं सोपं आहे, असं वक्तव्य संजूने केलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून आवेशने एका हातात कॅच घेतल्यानंतर सेलिब्रेशन केलं. एका हाताने कॅच घेतल्यानंतर आवेश खानने संजूचे ग्लोव्हज काढले आणि ड्रेसिंग रूम दाखवले. आवेश खानच्या या सेलिब्रेशनवर संजू नाराज झाला नाही. त्याने आवेशचं कौतूक केलं अन् खळखळून हसला.



प्रथम फंलदाजी करणाऱ्या कोलकात्यानं वादळी सुरुवात केली आहे. फिलिप सॉल्ट आणि सुनील नारायण यांनी कोलकात्याला वादळी सुरुवात करुन दिली. साल्ट 10 धावा काढून बाद झाल्यानंतर सुनील नारायणने सुत्र हातात घेतली अन् खणखणीत शतक ठोकलं. आयपीएलच्या यंदाच्या हंमागातील तिसरं शतक नारायणने नावावर केलं. आर आश्विन आणि युझी चहलला नारायणने फोडून काढलं. नारायणने 13 फोर अन् 6 सिक्सच्या मदतीने 56 बॉलमध्ये खणखणीत 109 धावा कुटल्या.


कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरीन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.


राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.