टीममध्ये वापसी करणाऱ्या हार्दिक पंड्याचा जबरदस्त कॅच
हार्दिकची टीममध्ये जबरदस्त वापसी
माउंट माउंगानुई : भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या माउंट माउंगानुई तिसऱ्या वनडेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडलेल्या ऑलराउंडर हार्दिक पंड्याने वापसी केली आहे. टीव्ही शो 'कॉफी विद करण'मध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या हार्दिक पांड्याला आणि लोकेश राहुलला भारतात परत बोलावून घेतलं होतं. पण 15 दिवसाच्या निलंबनानंतर हार्दिक पुन्हा एकदा संघात सहभागी झाला आहे. न्यूझीलंड दौऱ्यात त्यांनी टीममध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली.
हार्दिकच्या खेळीवर या वादाचा कोणताच परिणाम पाहायला मिळत नाही आहे. आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध सामन्यामध्ये दुखापतीमुळे बाहेर झालेल्या हार्दिक पांड्याचा हा त्यानंतरचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे. या सामन्यात त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनचा शानदार कॅच पकडत अनेकांचं मन जिंकलं.
कोलिन मुनरो आणि मार्टिन गुप्टील माघारी गेल्यानंतर केन विलियमसनने रॉस टेलरसोबत किंवींची इनिंग सांभाळली होती. पण 17 व्या ओव्हरला चहलच्या दुसऱ्या बॉलवर मिडविकेटच्या दिशेने शॉट खेळताच तेथे फील्डिंग करणाऱ्या हार्दिक पंड्याने जबरदस्त कॅच पकडला. विलियमसन आणि टेलरमध्ये 33 रनची पार्टनरशिप झाली. केनने 48 बॉलमध्ये 28 रन केले. अशा प्रकारे पंड्याने टीममध्ये वापसी केली.