Rohit Sharma Warn Sarfaraz Khan : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात नेहमी कुल अंदाजात दिसून येतो. मात्र, चूक झाली की रोहित कोणालाच सुट्टी देत नाही. आपल्या खेळाडूंची काळजी घेणं रोहितला चांगलंच जमतं. त्यामुळे तो लाडका कॅप्टन देखील बनलाय. अशातच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर एक व्हायरल (Viral Video) होतोय. टीम इंडियाचा फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) याला रोहित शर्माने चांगलंच झापलं. नेमकं काय झालं? पाहुया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, टीम इंडियाच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांननी लोटांगण घातलं. इंग्लंडला दुसऱ्या डावात 145 धावा केल्या. इंग्लंडच्या 133 धावा झाल्या असताना रॉबिन्सनची विकेट गेली. त्यावेळी रोहितने अजूनच क्लोज फिल्डिंग लावली. मात्र, 47 व्या ओव्हरवेळी सरफराजकडून एक चूक झाली. 


सरफराज नेहमीप्रमाणे सिली पाईंटवर फिल्डिंगला आला. मात्र, यावेळी त्याने हेलमेट घातलं नव्हतं. त्यावर रोहित चांगलाच भडकला. ए भाई, इथं हिरोगिरी करायची नाही, हेलमेट घाल, असं रोहित सरफराजला म्हणताना दिसतोय. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरफराजच्या काळजीपोटी रोहितने सरफराजला झापलं. त्यानंतर डगआऊटमधून सरफराजला हेलमेट मागवण्यात आलं.



दरम्यान, पहिल्या डावात सरफराजला खास कामगिरी करता आली नव्हती. सरफराजने पहिल्या डावात फक्त 14 धावा केल्या होत्या. सरफराजकडून मोठ्या धावांचं अपेक्षा असताना त्याला मैदानात टिकता आलं नाही.


टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.


इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.