PSL 2024 Babar Azam: सध्या पाकिस्तान सुपर लीग सुरु आहे. दरम्यान या लीगमध्ये एक अशी घटना घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. पाकिस्तान टीमचा माजी कर्णधार बाबर आझमला ( Babar Azam ) राग अनावर झाल्याचा हा व्हिडीओ आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझम ( Babar Azam ) पाकिस्तान सुपर लीग अर्थात पीएसएलच्या एका सामन्यात रनआऊट झाला. यावेळी रनआऊट झाल्यानंतर त्याचा राग अनावर झाला होता. बाबर आझमने ( Babar Azam ) ड्रेसिंग रूममध्ये खळबळ उडवून दिली असल्याचीही चर्चा आहे. 


पाकिस्तान सुपर लीग 2024 च्या 29 वा सामना पेशावर झाल्मी आणि कराची किंग्ज यांच्यामध्ये खेळवला गेला. या सामन्यात कराचीच्या नॅशनल स्टेडिममध्ये बाबर आझम ( Babar Azam ) चांगल्या फॉर्ममध्ये होता. बाबरने या सामन्यात 46 बॉल्समध्ये 51 रन्स केले होते. यावेळी त्याने त्याच्या खेळीत 5 फोर आणि एक सिक्स लगावली होती. मात्र बाबर ( Babar Azam ) 14 ओव्हरमध्ये रनआऊट झाला. विकेट गेल्यानंतरही बाबर चांगलाच संपालेला दिसून आला. 



ड्रेसिंग रूममध्येही संतापलेला दिसून आला बाबर


केवळ मैदानावरच नाही तर ड्रेसिंग रूममध्येही बाबरला ( Babar Azam ) संताप अनावर झाला होता. ड्रेसिंग रूममध्ये पोहोचताच त्याने बॅट आणि ग्लोव्ज जोरात फेकले. इतकं करूनही बाबर ( Babar Azam ) शांत बसला नाही. आपला राग काढण्यासाठी तो ड्रेसिंग रूममध्ये जोरात ओरडत होता. 


इतका का संतापला बाबर आझम?


बाबर आझमला ( Babar Azam ) इतका संताप अनावर झाला होता याचं कारण म्हणजे तो मोठा डाव खेळत होता, आणि त्याला विकेट गमवावी लागली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट खराब होता. यावेळी स्ट्राइक रेट सुधारण्याचा प्रयत्न करत असताना तो रनआऊट झाला. मात्र असं असूनही बाबरच्या ( Babar Azam ) टीमला विजय मिळवण्यात यश मिळालं.