Babar Azam Shaheen Shah Afridi Wedding Video: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीमध्ये वाद असल्याच्या चर्चांवर पडदा पडला तो शाहीन शाह आफ्रिदीच्या लग्नसोहळ्यात. बाबर आझमने या लग्नाला लावलेली उपस्थिती चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या भेटीची चर्चा असून पाकिस्तानी चाहते हे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत.


एन्ट्रीपासून मिठीपर्यंत चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबर आझमने अगदी शाही थाटात शाहीन शाह आफ्रिदीच्या लग्नाला हजेरी लावली. लग्न समारंभाच्या हॉलमध्ये पोहचल्यानंतर बाबरने शाहीनला कडकडून मिठी मारली. शाहीन शाह आफ्रिदीने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीची मुलगी अंशा हिच्याशी निकाह केला. आशिया चषक स्पर्धा संपल्यानंतर आणि विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याच्या काही दिवस आधीच हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अगदी बाबरच्या आगमनाचा व्हिडीओही चर्चेत आहे.



व्हिडीओ आणि ब्रोमान्स चर्चेत


बाबर आणि नवरदेव असलेल्या शाहीन शाह आफ्रिदीमधील भावाभावांचं नातं लग्न सोहळ्यात दिसून आल्याचं अनेकांनी या कार्यक्रमातील फोटो शेअर करत म्हटलं आहे. अगदी एकत्र जेवण करण्यापासून ते शाहीन शाह आफ्रिदीचे सासरे शाहीद आफ्रिदीबरोबर गप्पा गोष्टी करतानाचेही व्हिडीओही व्हायरल झालेत. तुम्हीच पाहा या लग्न सोहळ्यातील काही व्हिडीओ....


1)



2)



3)



बाबर आझमने स्वत: शाहीन शाह आफ्रिदी बरोबरचा फोटो शेअर करत त्याचं अभिनंदन केलं आहे.



...म्हणून सहा महिन्यात दुसऱ्यांदा केलं लग्न


शाहीन शाह आफ्रिदी आणि अंशा आफ्रिदीने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्न केलं होतं. मात्र आशिया चषकानंतर आपण पुन्हा अंशाबरोबर लग्न करणार असल्याचं शाहीन शाह आफ्रिदीने जाहीर केलं होतं. पहिल्यांदा लग्न झालं तेव्हा केवळ जवळचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक सोबत होते त्यामुळे आता पुन्हा लग्न करणार असल्याचं शाहीन शाह आफ्रिदी म्हणालेला.