Babar Azam pictures Photo Video leaked : पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझमच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कर्णधारपदावरून बाबरची उचलबांगडी होण्याच्या चर्चा सुरू असताना बाबरचे पर्सनल फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवरील eish. arajpoot या आयडीवर व्हिडीओ पोस्ट केले आहेत. कथित स्वरूपात तरूणीने बाबर आझमवर फसवणुकीचे आरोप केले आहेत. (Babar Azam caught in honey trap? Sexting personal pictures video leaked latets marathi Sport News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय आहे प्रकरण? 
पाकिस्तानचा विराट कोहली म्हणून ओळखला जाणाऱ्या बाबर आझमवर फसवणूक केल्याचे गंभीर आरोप करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर बाबरचे पर्सनल व्हिडीओ पोस्ट केले आहेत. एकामध्ये तो समोरील व्यक्तिसोबत संवाद साधत आहे, तर दुसऱ्या पोस्टमध्ये व्हाट्सअपवरील संभाषण असल्याचा दावा केला गेला आहे.


इन्स्टाग्रामवरील ईशा राजपूत नावाच्या हँडलवर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यात दिसणारी व्यक्ती पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम असल्याचा दावा करण्यात आला आहे. या फोटो आणि व्हिडिओंसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, तुमने जो किया, तुमको वही मिला.


 



बाबर आझमची अद्याप यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही. व्हिडीओमध्ये बाबर आझमच आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. सोशल मीडियावर बाबरचे फोटो आणि व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरले आहेत.  बाबर आझम हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचंही बोललं जात आहे. मात्र, सत्य काय आहे हे अजून समोर आलेलं नाही. 


दरम्यान, बाबर आझमच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानला घरच्या मैदानावर  0-3 ने व्हाईटवॉश, न्यूझीलंडविरुद्धची दोन कसोटी मालिकांची बरोबरीत सुटली होती. वनडे मालिकेमध्ये 2-1 ने पराभव झाला होता. या प्रदर्शनामुळे आधीच बाबरचं कर्णधारपद धोक्यात आलं असताना आता व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोंमुळे आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.