मुंबई : रनमशीन म्हणून विराट कोहलीची वेगळी ओळख आहे. कोहलीच्या नावावर अनेक रेकॉर्ड्सची नोंद आहे. विराट कोहली सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. विराट कोहली आणि बाबर आझम हे सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहेत. या दोन खेळाडूंमध्ये नेहमीच जोरदार लढत होत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबर आझमचा विराटपेक्षा कमी अनुभव आहे, पण त्याची नजर विराट कोहलीच्या विक्रमांवर राहिली आहे. कोहलीचे विक्रम मोडण्याचं त्याचं टार्गेट आहे. त्यामुळे आता कोहलीचा आणखी एक विक्रम धोक्यात आला आहे.


बाबर आझमकडे वन डेमध्ये सर्वात वेगानं शतक ठोकण्याची संधी आहे. बाबर आझमला आता सर्वात वेगवान 20 वनडे शतक झळकावण्याची संधी आहे. सध्या हा पराक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.


विराट कोहलीने वन डेच्या 133 डावांमध्ये 20 शतके पूर्ण केली होती, हा सर्वात वेगवान 20 शतकांचा विक्रम आहे. पण बाबर आझमने 86 डावांमध्ये 17 शतके ठोकली आहेत. वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावण्याच्या बाबतीत बाबर आझम विराटपेक्षा खूप वेगाने आघाडीवर आहे. कोहलीचा हा विक्रम मोडण्यापासून तो केवळ 3 शतकं दूर आहे.


कर्णधार बाबर आझमने नुकताच वन डे क्रिकेटमध्ये 1000 धावा आपल्या नावावर करण्याचा विक्रम केलं आहे. त्याने 13 डावात 1000 धावा केल्या आहेत. कोहलीने हा विक्रम 17 डावांमध्ये केला होता. एकामागे एक बाबर आझम कोहलीचे रेकॉर्ड मोडत आहे.