मुंबई : आशिया कपच्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तानचा श्रीलंकेकडून वाईट पराभव झाला. दोन्ही टीम आता अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या दोघांमधील स्पर्धा अधिकच रोमांचक होण्याची अपेक्षाही खूप वाढलीये. सुपर 4 मध्ये श्रीलंकेचा 5 विकेट्स राखून विजय झाला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 122 रन्सचं लक्ष्य दिलं होतं, जे श्रीलंकेने 18 बॉल्स आधी पूर्ण केले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला. ज्याला फक्त 30 रन्स करता आले.


न विचारता घेतला रिव्ह्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कप स्पर्धेत खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या बाबर आझमची या सामन्यात भारतीय अंपायरशी बाचाबाचीही झाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. खरं तर ही घटना प्रकरण 16व्या ओव्हरमध्ये घडली. जेव्हा हसन अलीच्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर मोहम्मद रिझवानने कॉट बिहांइडसाठी अपील केलं, पण दासुन शनाकाला आऊट देण्यात आलं नाही.


यावेळी रिझवानने त्यांटा कर्णधार बाबरला न विचारता रिव्ह्यू घेतला आणि अंपायर अनिलनेही थेट डीआरएस मागवला. यावर बाबर म्हणाला की, मी कुठेय... मीच कर्णधार आहे.



पाकिस्तानचा रिव्ह्यू घालवला फुकट


पाकिस्तानचा हा रिव्ह्यू वाया गेला आणि शनाका वाचला. यानंतर 17व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर श्रीलंकेचा कर्णधार मोहम्मद हसनैनचा बळी ठरला. हसनैनने दासुन शनाकाला हसन अलीकडे झेलबाद केले. श्रीलंकेच्या कर्णधाराने 16 बॉलमध्ये 21 रन्स केले.