पहिल्यांदा भारतावर विजय मिळवूनही खूश नाहीये बाबर आझम; `हे` आहे कारण
टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतावर पाकिस्तानचा हा पहिला विजय आहे.
दुबई : दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या ICC T20 वर्ल्डकपच्या मॅचमध्ये पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतावर पाकिस्तानचा हा पहिला विजय आहे. 29 वर्षांनंतर प्रथमच विश्वचषकासारख्या स्पर्धेत भारत पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (68) आणि मोहम्मद रिझवान (79) या विजयाटे शिल्पकार ठरलेत.
जिंकल्यावरही खूश नाही पाक कर्णधार
भारताविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये बाबर आझम म्हणाला, 'सेलिब्रेट करा. हॉटेलवर परत या आणि आपल्या कुटुंबासोबत या क्षणाचा आनंद घ्या, पण हा सामना संपला आहे हे विसरू नका आणि बाकीच्या सामन्यांसाठी आम्हाला तयारी करायची आहे.
बाबर पुढे म्हणाला, "आता तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. आज रात्री प्रत्येकाने या क्षणाचा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे, परंतु संघातील आपली भूमिका आणि उर्वरित सामन्यातील अपेक्षा लक्षात ठेवा. आम्ही केवळ भारताला हरवण्यासाठी नाही तर विश्वचषक जिंकण्यासाठी आलो आहोत. हे विसरून चालणार नाही."
पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हक म्हणाला की, "खेळाडूंनी टी -20 वर्ल्ड जिंकण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आशा आहे की आम्ही आनंदात बुडून जाऊ नका आणि आणखी सामने खेळायचे आहेत आणि टी-20 वर्ल्डकप जिंकायचा आहे हे विसरू नका.
पाकिस्तानकडून भारताचा पराभव
पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हक म्हणाला की, खेळाडूंनी टी -20 विश्वचषक जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. स्पर्धेपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणार्या वकार युनूससोबत एका चॅनलवर मिसबाह म्हणाला, "आशा आहे की आम्ही आनंदात बुडून जाऊ नये आणि आम्हाला आणखी सामने खेळायचे आहेत आणि टी२० विश्वचषक जिंकायचा आहे हे विसरू नका. "मिस्बाह म्हणाला की, संघाने अतिशय शिस्तबद्ध कामगिरी करत भारताचा दहा गडी राखून पराभव केला. ते म्हणाले, 'आता ही शिस्त यापुढेही जपायची आहे. प्रत्येक खेळाडूने आपली भूमिका बजावली पाहिजे.