Pakistan Cricket : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून (t20 world cup 2024) पाकिस्तानचा संघ बाहेर पडला आहे. ग्रुप स्टेजमध्येच पाकिस्तानचा सुपडा साफ झाला अन् आता पाकिस्तानी खेळाडूंनी पुन्हा मायदेशी परतावं लागलं आहे. अशातच आता पाकिस्तानवर जगभरातून टीका होताना दिसते. सर्वत्र नाचक्की होत असतानाच आता कॅप्टन बाबर आझम (babar azam) याच्यावर धक्कादायक आरोप करण्यात आलाय. पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार मुबशीर लुकमान (Pakistan journalist Mubashir Luqman) यांनी कॅप्टन बाबर आझम याच्यावर मॅच फिक्सिंगचा (Match fixing) आरोप केला आहे. त्यामुळे आता क्रिडाविश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-20 विश्वचषक स्पर्धेतून ग्रुप स्टेजमधून बाहेर पडल्यानंतर वरिष्ठ पत्रकार मुबशीर लुकमान यांनी सोशल मीडियावरून बाबर आझमवर आरोप केला. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. आंतरराष्ट्रीय सामने गमावल्याच्या बदल्यात पाकिस्तानच्या कर्णधाराला महागड्या भेटवस्तू मिळाल्याचा दावा मुबशीर लुकमान यांनी केलाय. कॅप्टन बाबर आझमला जी ऑडी ई-ट्रॉन गाडी मिळाली होती, ती त्याच्या भावाने दिली होती. मात्र, लुकमान यांनी गंभीर आरोप केला. भावाकडून भेट म्हणून दिलेली गाडी संशयास्पद बुकींकडून विकत घेतली गेली होती, असा आरोप पत्रकार लुकमान यांनी केलाय.


एवढंच नाही तर बाबर आझमला ऑस्ट्रेलिया आणि दुबईमध्ये अपार्टमेंट देखील मिळाले होते, असंही त्यांनी यावेळी सांगितलंय. मुबशीर लुकमान याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता बाबर आझम आणि पाकिस्तान संघाची चौकशी व्हावी, अशी मागणी पाकिस्तानमधून केली जात आहे. पाकिस्तान हातात आलेला सामना हरल्यावर माझा संशय अधिक वाढला, असं लुकमान यांनी म्हटलं आहे.


पाहा Video



दरम्यान, पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपमधून अजून बाहेर पडला असला तरी देखील अनेक खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये न जाता परदेशी फिरण्याला पसंती दिलीये. बाबर आझमसह अनेक खेळाडू सुट्टी घालवण्यासाठी कुटूंबासह लंडनमध्ये गेले आहेत. तर नसीम शाह आणि उस्मान खान यांसारखे काही खेळाडूच बुधवारी लाहोर विमानतळावर पोहोचले होते. त्यामुळे पाकिस्तान संघावर सध्या मोठ्या प्रमाणात टीका देखील होताना दिसत आहे.