मुंबई : 2021चं वर्ष पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी फार चांगलं होतं. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्यांनी अधिक सामने जिंकले असून भारतालाही मागे टाकलं आहे. टी-20 वर्ल्डकपचा भारताला दावेदार मानलं जात असताना टीम इंडियाचं हे स्वप्न पाकिस्तानने धुळीला मिळवलं. याशिवाय वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा पाकिस्तानने भारताचा पराभव केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान नव्या वर्षी पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमने एक मोठं वक्तव्य केलं आहे. क्रिकेट पाकिस्तान बोर्डाने एक पोडकास्ट रिलीज केलंय. ज्यामध्ये बाबर आझमने सांगितलंय की, टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमला हरवणं ही पाकिस्तान टीमसाठी बेस्ट मोमेंट होती.


वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाचा भारताचा पराभव


वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाचा पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. यापूर्वी कधीही पाकिस्तानने वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव केला नव्हता. यामुळेच पाकिस्तान टीमसाठी ही 2021ची सर्वात बेस्ट मोमेंट होती.


बाबर पुढे म्हणाला की, आमच्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट ही होती की, या वर्षी आम्ही कठीण परिस्थितीत अनेक तरूण खेळाडूंना बेस्ट परफॉर्मन्स देताना पाहिलं. आमच्याकडूनही अनेक तरूण खेळाडू पुढे येत असल्याचा आनंद आहे.


2021 वाईट क्षण


तर पाकिस्तान टीमसाठी 2021मधील सर्वात वाईट क्षण म्हणजे ऑस्ट्रेलियाकडून मिळालेला पराभव. यामुळे आमच्या टीमला खूप दुःख झाल्याचंही बाबरने सांगितलं. 


बाबर म्हणाला, ऑस्ट्रेलियाकडून हरल्यानंतर मलाही फार दुःख झालं होतं. त्या टूर्नामेंटमध्ये आम्ही खूप चांगला खेळ केला होता. त्यामुळे तो पराभव आमच्या सर्वांच्या जिव्हारी लागला.