मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्सला आता कुठे थोडा दिलासा मिळतोय म्हणताना सर जडेजाचं टेन्शन वाढलं आहे. वेगवान गोलंदाज दीपक चाहर अजूनही पूर्ण फिट झाला नाही. त्यामुळे तो आयपीएलचे सामने खेळू शकत नाही. आयपीएलमधून तो बाहेर झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ड इंडिज विरुद्धच्या टी 20 सामन्या दरम्यान दीपक चाहरला दुखापत झाली होती. ही दुखापत रिकव्हर होईल असा अंदाज होता. मात्र अजूनही तो पूर्ण फिट होऊ शकला नाही. 29 वर्षीय दीपक चाहर आयपीएलचा अजून एकही सामना खेळला नाही. आता दुखापतीमुळे तो पुढचे तीन महिने मैदानापासून बाहेर राहू शकतो. 


आयपीएलच्या एका मोठ्या सत्राचा भाग असलेल्या दीपक चाहर मात्र यंदा आयपीएल खेळू शकणार नाही. एप्रिल अखेरपर्यंत सामना खेळण्यासाठी उपलब्ध होईल अशी अशा होती. मात्र या सगळ्या आशा मावळल्या आहेत. 


दीपक चाहर 12 आठवडे मैदानापासून दूर राहणार असल्याच्या वृत्तावर BCCI आणि चेन्नईनं शिक्कमोर्तब केला. त्यामुळे आता रविंद्र जडेजाचं टेन्शन थोडं वाढलं आहे. आता टी 20 वर्ल्ड कपमध्येही त्याला संधी मिळणार की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


चेन्नईनं 14 कोटी रुपये देऊन दीपक चाहरला रिटेन केलं होतं. मात्र दुखापतीमुळे तो आयपीएलमधील एकही सामना खेळू शकला नाही. आता आयपीएलमधून तो बाहेर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला आराम करण्याची गरज असल्याने तो पुढचे काही आठवडे मैदानात दिसणार नाही. 


दीपकची कमतरता टीममध्ये जाणवत आहे. चेन्नईनं आतापर्यंत 4 सामने गमवले असून एक सामना जिंकला आहे. दुसरा सामना जिंकण्याची तयारी चेन्नईनं करत आहे.