जकार्ता : कुस्तीपटू बजरंग पुनियानं भारताला यंदाच्या आशियाई स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. ६५ किलो वजनी गटामध्ये बजरंगनं जपानच्या दाईची ताकातानीचा ११-८नं पराभव केला. या मॅचमध्ये सुरुवातीलाच बजरंगनं ६-०ची आघाडी घेतली होती. पण ताकातानीनं मॅच ६-४ अशा रंगतदार अवस्थेमध्ये आणली. पण शेवटी बजरंगनं फायनल पंच मारत ताकातानीला ११-८नं धूळ चारली.


अटलजींना समर्पित केलं पदक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान बजरंग पुनियानं त्याला मिळालेलं सुवर्ण पदक भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना अर्पण केलं आहे. १६ ऑगस्टला अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं होतं.



त्याआधी भारताकडून १० मीटर एयर राइफल मिक्सडमध्ये अपूर्वी चंदीला आणि रवी कुमार यांना कास्य पदक जिंकलं आहे. शनिवारी १८ व्या आशियाई स्पर्धेची ओपनिंग सेरेमनी रंगली. आणि आज वेगवेगळ्या स्पर्धांना सुरुवात झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.