WFI suspended : गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या वादावर आता तोगडा निघाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघावर (WFI) मोठी कारवाई केली. क्रीडा मंत्रालयाने नुकतेच निवडून आलेले अध्यक्ष संजय सिंह यांना पदावरून निलंबित केलंय तर भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता (WFI suspended) रद्द केली आहे. पुढील आदेशापर्यंत संपूर्ण टीमला निलंबित करण्यात आल्याचं क्रिडा मंत्रालयाने म्हटलं आहे. सरकारचा या निर्णयामुळे कुस्तीपटूंनी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना धोबीपछाड दिलाय, अशी चर्चा होताना दिसत आहे. मात्र, कुस्तीपटू अजूनही नाराज असल्याचं चित्र समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलिका कुस्तीपटूंसाठी पद्मश्री परत करणाऱ्या बजरंग पुनिया याने मोठा निर्णय घेतला आहे. आमच्या बहिणींच्या सन्मानापेक्षा कोणतेही बक्षीस मोठे नाही. आधी न्याय मिळाला पाहिजे. मी पद्मश्री परत घेणार नाही. मला न्याय मिळाल्यावरच मी याचा विचार करेन, असं बजरंग पुनिया याने म्हटलं आहे. त्यामुळे आता बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल विचारला जात आहे. बजरंगनंतर साक्षी मलिकने देखील नाराजी व्यक्त केली. आमचा लढा महिला कुस्तीपटूंसाठी आहे. मी माझी निवृत्ती जाहीर केली आहे, पण आगामी कुस्तीपटूंना न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे, असं साक्षी मलिकने म्हटलं आहे.


केंद्र सरकारच्या निर्णयानंतर लगेचच ब्रिजभूषण शरण सिंह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना बृजभूषण शरण सिंह यांनी कुस्ती संघटनेतून निवृत्तीची घोषणा केली. मी कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकाही येत आहेत, त्यामुळे माझे लक्ष त्याकडे आहे, असं ब्रिजभूषण म्हणाले.



दरम्यान, महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हीने गुरुवारी 21 डिसेंबर रोजी निवृत्तीचा निर्णय घेतला होता. तर बजरंग पुरस्कार परत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या शासकीय निवासस्थानापर्यंत पोहचला. त्यावेळी पोलिसांनी त्याला रोखलं होतं. त्यानंतर त्याने आपला पुरस्कार रस्त्यावर ठेवला. महिला कुस्तीपटूंवर लैगिंक शोषण केल्याचा आरोप कुस्तीपटूंकडून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी कुस्तीपटूंकडून करण्यात येत आहे.