पर्थ : ऍशेसच्या तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कनं टाकलेल्या बॉलची चर्चा सध्या क्रिकेट रसिकांमध्ये सुरु आहे. काही जणांनी तर स्टार्कनं टाकलेला हा बॉल शतकातला सर्वोत्तम असल्याची प्रतिक्रियाही दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या टेस्टच्या चौथ्या दिवशी चहापर्यंत इंग्लंड १८८ रन्सनं पिछाडीवर होती. चहानंतर जेम्स विंसेनं त्याचं अर्धशतक पूर्ण केलं तर त्याला साथ देत होता पहिल्या इनिंगमध्ये शतक झळकावणारा डेविड मलान.


विंसे ५५ रन्सवर असताना मिचेल स्टार्कनं तो भेदक बॉल टाकला. स्टार्कनं टाकलेला हा बॉल विंसेला झेपलाच नाही आणि तो बोल्ड झाला. टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या बॉलनं विंसेचा ऑफ स्टंप उडवला. पीचवर पडलेल्या टप्प्यामुळे बॉलनं दिशा बदलल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत आहे. इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसननं हा बॉल ऍशेसमधला सर्वोत्तम असल्याचा दावा केला.


इंग्लंड पराभवाच्या छायेत


पहिली आणि दुसरी टेस्ट हारल्यानंतर इंग्लंड ही अॅशेस सीरिज हारण्याच्या छायेत पोहोचली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं ४ विकेट्स गमावून १३२ रन्स बनवल्या आहेत, आणि अजूनही इंग्लंड १२७ रन्सनं पिछाडीवर आहे.


पाहा मिचेल स्टार्कचा भेदक बॉल