ढाका : बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया (BAN vs IND) यांच्यातील वनडे सीरिजला रविवारी 4 डिसेंबरपासून सुरुवात होतेय. पहिल्या सामन्याचं आयोजन हे राजधानी ढाक्यात (Dhaka) करण्यात आलंय. टीम इंडियाचं (Team India) या मालिकेत रोहित शर्मा नेतृत्व करणार आहे. मात्र त्याआधी टीमला मोठा धक्का बसलाय. कॅप्टन दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलाय. तसेच कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यालाही मुकावं लागू शकतं.  (ban vs ind odi series bangladesh captain tamim iqbal ruled out of series due to groin injurey against team india)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशचा कर्णधार तमीम इकबालला (tamim iqbal) ग्रोईन इंज्युरीमुळे (groin injurey) एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडावं लागलंय. त्यामुळे शकिब अल हसनला कॅप्टन्सीची जबाबदारी मिळू शकते.  इकबालला 30 नोव्हेंबरला शेर-ए-बांगला स्टेडियममध्ये सरावादरम्यान दुखापत झाली. तमीमला दुखापतीतून सावरण्यात किती दिवस लागतील, याबाबत निश्चितता नाही. तसंच तमिमशिवाय तस्किन अहमदलाही दुखापतीमुळे पहिल्या वनडेत खेळता येणार नाही.  


एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश


तमीम इकबाल (कर्णधार), लिट्टन दास, अनामुल हक बिजॉय, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, अफीफ होसैन, यासिर अली, मेहिदी हसन मिराज, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद (दुखापतग्रस्त), हसन महमूद, इबादत होसैन, नसुम अहमद, महमूदुल्लाह, नजमुल होसैन शंटो, काजी, नूरुल हसन सोहन आणि शोरीफुल हसन (राखीव)


वनडे सीरिजसाठी टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि यश दयाल.