ICC Charged 8 people for corruption : बांगलादेशचा माजी खेळाडू नासिर हुसेन याच्यासह 8 जणांवर अबू धाबी टी10 लीग 2021 मध्ये अमिराती क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेच्या विविध पैलूंचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. अशातच आयसीसीने ईसीबीच्या वतीने खेळाडूंवर कारवाई केली आहे. नासिर हुसेन याच्याविरुद्ध तीन आरोप योग्य ठरले आहेत. नासिर हुसेन (Nasir Hussain) याला एका व्यक्तीकडून भेटवस्तू मिळाली होती. हुसेनने काही खास गोष्ट मागिल्याची माहिती देखील समोर आलीये. तर हुसेनकडून याबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्ड किंवा ऍन्टी करप्शन ऑफिसरला कुठलीच माहिती दिली गेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नासिर हुसेनने तपास अधिकाऱ्यांना सहकार्य केलं नाही, असा ठपका देखील त्याच्यावर ठेवण्यात आलाय. त्यामुळे त्याला भ्रष्टाचाराचा प्रस्ताव स्वीकारणं आणि याविषयी सर्व माहिती अधिकाऱ्यांपासून लपवून ठेवण्यासाठी दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे आता नासिर हुसेन दोन वर्ष क्रिकेट खेळू शकणार नाही. त्याच्यावर आयसीसीकडून 7 एप्रिल 2025 पर्यंत बंदी घातली गेली आहे.


हुसेनला 750 डॉलर्सपेक्षा जास्त किंमत असलेला आयफोन 12 भेट म्हणून दिला गेला होता, अशी माहिती ऍन्टी करप्शन ब्युरोला मिळाली होती. त्यावेळी त्याने याची माहिती बोर्डाला किंवा आयसीसीला देणं अपेक्षित होतं. मात्र, त्याने तसं केलं नाही. एवढंच नाही तर काही महत्वाची कागदपत्रेही अधिकाऱ्यांना दिली नाहीत, असा आरोप देखील त्याच्यावर करण्यात आला आहे.



दरम्यान, नासिर हुसेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने बांगलादेशकडून 19 कसोटी, 65 एकदिवसीय आणि 31 टी-20 सामने खेळले आहेत. रहस्यमय भेटवस्तू मिळाल्याबद्दल स्पष्टीकरण देऊ न शकल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर कलम 2.4.3, 2.4.4 आणि 2.4.6 चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.