मुंबई : सर्वंच क्रिकेट संघ आगामी टी20 वर्ल्डकपच्या (T20 World cup) तयारीला लागले असताना आता मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियातील शिखर धवन, आर.अश्विन आणि मोहम्मद शमी यांच्या निवृत्तीची चर्चा असताना टी20 तल्या तडाखेबाज बॅटसमनने निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे त्याच्या संघाला टी20 वर्ल्डकपआधी मोठा धक्का बसला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेश क्रिकेट संघाचा दिग्गज सलामीवीर तमिम इक्बालने (tamim iqbal) आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 ने शानदार विजय मिळवल्यानंतर त्याने लगेचच T20I मधून निवृत्तीती घोषणा केली. विशेष म्हणजे टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शैलीत तमिमने निवृत्तीची जाहीर केली आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु आहे.  


पोस्ट काय?
तमिमने वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर धोनीची आठवण करून दिली. तमिम इक्बालने त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवर बांगला भाषेत एक छोटासा संदेश पोस्ट केला. या पोस्टमध्य़े तो लिहतो, "मी आजपासून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे समजा. तुम्हा सर्वांचे आभार,असे तो म्हणालाय. 


टी 20 वर्ल्ड कपनंतर हे खेळाडू संन्यास घेण्याच्या तयारीत? पाहा लिस्टमध्ये कोण


धोनी स्टाईल निवृत्ती
एमएस धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. धोनीने इंस्टाग्रामवर “आतापर्यंत तुमच्या प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद, अशी पोस्ट लिहत निवृत्ती घेतली होती. 


टी20 कारकीर्द
तमिम इक्बालने 2007 मध्ये केनियाविरुद्ध टी-20 मध्ये पदार्पण केले होते. त्याने एकूण 78 T20I सामने खेळले आणि 24 च्या सरासरीने आणि 117 च्या स्ट्राइक रेटने एकूण 1758 धावा करण्यात यशस्वी झाला. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि 7 अर्धशतके आहेत. 2016 टी-20 विश्वचषकात ओमानविरुद्ध त्याने टी-20 मध्ये एकमेव शतक झळकावले होते. त्या सामन्यात इक्बालने केवळ 63 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या होत्या. दरम्यान 2016 च्या टी-20 विश्वचषकातही तमिम सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. स्पर्धेतील 6 सामन्यांमध्ये त्याने 73.75 च्या प्रभावी सरासरीने एकूण 295 धावा केल्या.


तमिम हा बांगलादेशच्या सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे, त्यामुळे T20 विश्वचषकापूर्वी त्याची क्रिकेटमधून निवृत्ती संघाला महागात पडू शकते.