New Zealand vs Bangladesh : वर्ल्ड कपपूर्वी (World Cup) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात (NZ vs BAN 2nd ODI) न्यूझीलंडने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केलाय. हा विजय न्यूझीलंडसाठी अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरला. न्यूझीलंड संघाला तब्बल 15 वर्षांनंतर वनडे फॉरमॅटमध्ये एकदिवसीय सामना जिंकण्यात यश आलंय. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाला 49.2 ओव्हरमध्ये सर्व गडी गमावून 254 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 41.1 ओव्हरमध्ये केवळ 168 धावाच करू शकला. न्यूझीलंड संघाने हा सामना 86 धावांनी जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. मात्र, आजच्या सामन्यात नाट्यमय घडामोड घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशने मिरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. न्यूझीलंडच्या डावाच्या 46 वी ओव्हर सुरू होती. वेगवान गोलंदाज हसन महमूद (Hasan Mahmood) याने ईश सोढीला मंकडिंग (Mankadig appeal) केलं. त्यावेळी तो 26 चेंडूत 17 धावा करत फलंदाजी करत होता. ईश सोढी (Ish Sodhi) आधीच नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी क्रीजच्या बाहेर होता. ईश सोढीने रिव्ह्यू घेतला अन् थर्ड अंपायरने सोढीला बाद जाहीर केलं. पण बांगलादेशचा कर्णधार लिटन दास (Litton Das) आणि सौम्या सरकार यांनी अंपायरशी बोलून सोढीला परत बोलावलं. सोढी परत आल्यावर त्याने हसनला मिठी मारली. मात्र, लिटन दासच्या या खिलाडूवृत्तीचं सध्या कौतुक होताना दिसतंय.


पाहा Video



दरम्यान, क्रीझवर परतल्यानंतर सोढीने 39 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 35 धावा केल्या आणि संघाची धावसंख्या 254 पर्यंत पोहचवली. त्यानंतर बॉलिंग करताना देखील सोढीने कमाल केली. त्याने 10 षटकात 39 धावा देत 6 बळी घेतले अन् न्यूझीलंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिलाय.


आणखी वाचा - राहुल द्रविडच्या लेकाची अचानक टीममध्ये एन्ट्री; बापासारखा तगडा बॅटर


बांगलादेशची टीम | तमीम इक्बाल, लिटन दास (C), तनझिद हसन, सौम्या सरकार, महमुदुल्लाह, तौहिद हृदोय, महेदी हसन, खालेद अहमद, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद.


न्यूझीलंडची टीम | फिन ऍलन, विल यंग, चाड बोवेस, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (WK), रचिन रवींद्र, कोल मॅककॉन्ची, काइल जेमिसन, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन (C), ट्रेंट बोल्ट.